PAK vs ENG : पहिल्याच दिवशी 506 धावा, 4 शतकं; इंग्लंडने पाकिस्तानमध्येच पाक गोलंदाजांची काढली पिसं | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pakistan Vs England 1st Test

PAK vs ENG : पहिल्याच दिवशी 506 धावा, 4 शतकं; इंग्लंडने पाकिस्तानमध्येच पाक गोलंदाजांची काढली पिसं

Pakistan Vs England 1st Test : इंग्लंडने पाकिस्तानात पाकिस्तानच्याच गोलंदाजांची एकाच दिवसात पिसे काढली. रावळपिंडी येथील पहिल्या कसोटीचा पहिला दिवस संपला त्यावेळी प्रथम फलंदाजी करणाऱ्या इंग्लंडने 4 फलंदाजांच्या मोबदल्यात 506 धावा केल्या आहेत. इंग्लंडकडून पहिल्या तीन फलंदाजांनी शतकी खेळी केली. सलामीवीर झॅक क्राऊलीने 122, बेन डकेटने 107, ऑली पॉपने 108 धावांची खेळी केली. यानंतर पाचव्या क्रमांकावर हॅरी ब्रुक्सने नाबाद 101 धावांची खेळी केली. इंग्लंडकडून बाद झालेल्या फक्त ज्यो रूटला शतकी खेळी करता आली नाही. तो 23 धावा करून बाद झाला.

हेही वाचा: FIFA World Cup : ब्राझीलच्या पुनम पांडेची मोठी घोषणा; टीमच्या प्रत्येक गोलवर करणार...

इंग्लंड तब्बल 17 वर्षानंतर पाकिस्तानमध्ये कसोटी सामना खेळत आहे. आजपासून पाकिस्तानातील रावळपिंडीमध्ये पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यातील पहिला कसोटी सामना सुरू झाला. इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडचे सलामीवीर झॅक क्राऊली आणि बेन डकेट्स यांनी 35 षटकातच 233 धावांची सलामी दिली. अखेर जाहिद महमूदनेने ही जोडी फोडली. त्याने बेन डकेट्सला 107 बाद केले.

त्यानंतर दुसारा शतक ठोकणारा सलामीवीर झॅक क्राऊली (122) देखील माघारी परतला. त्याचा हारिस रौऊफने त्रिफळा उडवला. इंग्लंडचा स्टार फलंदाज जो रूट देखील 23 धावा करून बाद झाला. रूट बाद झाला त्यावेळी इंग्लंडच्या 3 बाद 286 धावा झाल्या होत्या. दरम्यान, ऑली पोप आणि हॅरी ब्रुक्सने चौथ्या विकेटसाठी 176 धावांची भागीदारी रचली. ऑली पोपने 108 धावांची शतकी खेळी केली.

हेही वाचा: Shahid Afridi : माझ्या नेतृत्वात पाकिस्तान वर्ल्डकप खेळण्यासाठी भारतात गेला तेव्हा... आफ्रिदीचं मोठं वक्तव्य

पोपला मोहम्मद अलीने बाद केल्यानंतर ब्रुक्सने बेन स्टोक्सबरोबर दिवसअखेरपर्यंत नाबाद 44 धावांची भागीदारी रचली. दरम्यान, ब्रुक्सने देखील आपले शतक पूर्ण केले. पहिल्या दिवसाचा खेळ संपला त्यावेळी इंग्लंडने 75 षटकात 4 बाद 506 धावा ठोकल्या होत्या. ब्रुक्स 101 धावा करून तर स्टोक्स 34 धावा करून नाबाद होते. पाकिस्तानकडून जाहीद महमूद 2 तर हारिस रौऊफ, मोहम्मद अलीने प्रत्येकी 1 विकेट घेतली.

हेही वाचा : आरामात फेडू शकाल अशीच घ्या कर्जे....