PAK vs NZ : पाक करणार 1992 च्या इतिहासाची पुनरावृत्ती; न्यूझीलंडविरूद्धच्या सेमी फायनलमध्ये काय घडलं होतं?

Pakistan Vs New Zealand 1992 World Cup Semi Final
Pakistan Vs New Zealand 1992 World Cup Semi FinalESAKAL

Pakistan Vs New Zealand : आज न्यूझीलंड आणि पाकिस्तान टी 20 वर्ल्डकप 2022 च्या सेमी फायनलमध्ये एकमेकांना भिडणार आहेत. पाकिस्तान न्यूझीलंडची आयसीसी वर्ल्डकप स्पर्धेत एकूण तीन वेळा भिडली आहे. त्यातील 1992 ला तर पाकिस्तानने वर्ल्डकपला गवसणी घातली होती. त्यामुळे पाकिस्तान आणि न्यूझीलंड याच्यातील वर्ल्डकपमधील इतिहास काय सांगतो हे देखील समजून घेणे गरजेचे आहे.

Pakistan Vs New Zealand 1992 World Cup Semi Final
PAK vs NZ T20WC22 LIVE : आज ठरणार वर्ल्डकपचा पहिला फायनलिस्ट

पाकिस्तान 1992 चा इतिहासाची करणार का पुनरावृत्ती?

पाकिस्तान आणि न्यूझीलंड हे 1992 मध्ये सेमी फायलनलमध्ये एकमेकांना भिडले होते. त्यावेळी पाकिस्तानने न्यूझीलंडला मात देत अंतिम फेरी गाठली होती. यानंतर त्यांनी अंतिम फेरीत इंग्लंडचा पराभव करत वर्ल्डकपवर नाव कोरले होते.

सध्याच्या टी 20 वर्ल्डकपमध्ये देखील काही अंशी तशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात दुसरा सेमी फायनल सामना होणार आहे. तर आज पाकिस्तान न्यूझीलंडशी सेमी फायनल खेळणार आहे. त्यामुळे 1992 सारखी 2022 मध्ये देखील पाकिस्तान इंग्लंड फायलन होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Pakistan Vs New Zealand 1992 World Cup Semi Final
Sanjana Genshan: 'मी सुंदर नाही म्हणतो, तुझा चेहरा चपलेसारखा' बुमराहच्या बायकोचा 'यॉर्कर'

पाकिस्तान - न्यूझीलंड वर्ल्डकप इतिहास

पाकिस्तानने न्यूझीलंडला 1992, 1999 आणि 2007 च्या टी 20 वर्ल्डकप सेमी फायनलमध्ये पराभूत केले होते. दुसरीकडे न्यूझीलंडचा गेल्या काही काळापासूनचा वर्लडकपमधील नॉक आऊट स्टेजमधील प्रवास पाहिला तर न्यूझीलंडने गेल्या सात वर्षात तीन वर्ल्डकप फायनल गमावल्या आहेत. 2015 आणि 2019 ला न्यूझीलंड वनडे वर्ल्डकपच्या अंतिम फेरीत पोहचली होती. मात्र त्यांना अंतिम सामना जिंकता आला नव्हता. तर 2021 मध्ये त्यांनी टी 20 वर्ल्डकप अंतिम फेरीत धडक मारली होती. मात्र त्यांना ऑस्ट्रेलियाचे आव्हान परतवून लावता आले नव्हते.

आजच्या सामन्यासाठी दोन्ही संघांचे बलाबल चाचपून पाहिले तर न्यूझीलंडची फलंदाजी आणि वेगवान गोलंदाजी अव्वल दर्जाची आहे. तर पाकिस्तानकडे देखील चांगला वेगवान मारा आहे. मात्र त्यांच्या फलंदाजीत सातत्य नाही. दुसरीकडे न्यूझीलंडच्या अनेक फलंदाजांनी यंदाच्या स्पर्धेत दमदार फलंदाजी करून दाखवली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com