Babar Azam : दिवस फिरले! कसोटीत धावबाद होणारा बाबर ठरला चेष्टेचा विषय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Babar Azam Run Out In Test Cricket Trolled

Babar Azam : दिवस फिरले! कसोटीत धावबाद होणारा बाबर ठरला चेष्टेचा विषय

Babar Azam : पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या कसोटीत पाहुण्या किवींनी पहिल्याच डावात 449 धावांचा डोंगर उभारल्यानंतर त्याला प्रत्युत्तर देताना पाकिस्तानला सुरूवातीलाच झटके बसले. या झटक्यातून सलामीवीर इमाम - उल - हकने नाबाद अर्धशतकी खेळी करत डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र इतर फलंदाजांनी त्याची मोक्याच्यावेळी साथ सोडली. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने तर कहरच केला. तो कसोटी क्रिकेटमध्ये धावाबाद झाला.

हेही वाचा: Virat Kohli : सामान्य कामगिरी! विराट कोहली बाबत आईसलँड क्रिकेटचे वादग्रस्त ट्विट

न्यूझीलंडने पहिल्या डावात 449 धावा केल्यानंतर त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी पाकिस्तानने आज कसोटीच्या दुसऱ्या दिवशी आपला पहिला डाव सुरू केला. मात्र संघाच्या अवघ्या 27 धावा झाल्या असताना सलामीवीर अब्दुल्ला शफीक 19 धावा करून बाद झाला. त्यानंतर आलेला शान मसूद देखील 11 चेंडूत आक्रमक 20 धावा करून माघारी फिरला. पाकिस्तानची अवस्था 2 बाद 56 धावा अशी झाली असताना पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम मैदानावर आला.

त्याने इमाम उल हक आणि बाबर आझमने डाव सावरत भागीदारी रचण्यास सुरूवात केली. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 43 धावांची भागादीरी रचत संघाला शंभर धावांच्या जवळ पोहचवले होते. मात्र याचवेळी बाबर आझम आणि इमाम यांच्या तीन धावा घेण्याच्या नादात गोंधळ निर्माण झाला. या गोंधळात बाबर आझम धावाबाद झाला. बाबर आझमने 41 चेंडूत 24 धावा केल्या होत्या.

हेही वाचा: IND vs SL 1st T20 : हार्दिक पांड्या ऋतुराज ऐवजी गुजरात टायटन्सच्या सलामीवीराला देणार संधी?

बाबर आझम धावबाद झाल्यावर सोशल मीडियावर याबाबतच्या पोस्ट चांगल्याच व्हायरल होत आहेत.

हेही वाचा : ५० वर्षांनंतर ज्येष्ठ नागरिकांची संख्या होणार तरुणांच्या दुप्पट

टॅग्स :CricketBabar Azam