2.5 षटक 2 विकेट्स अन् 0 धावा! 3 षटके खेळताना पाकिस्तानची ही अवस्था; किवींची कराचीत जोरदार हवा | PAK vs NZ Tim Southee | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pakistan Vs New Zealand 2nd Test Tim Southee Trick

PAK vs NZ : 2.5 षटक 2 विकेट्स अन् 0 धावा! 3 षटके खेळताना पाकिस्तानची ही अवस्था; किवींची कराचीत जोरदार हवा

Pakistan Vs New Zealand 2nd Test Tim Southee Trick : पाकिस्तान - न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या कसोटीत चौथ्या दिवशी किवींनी आपल्या दुसऱ्या डावात 5 बाद 277 धावा करत पाकिस्तानसमोर विजयासाठी 319 धावांचे आव्हान ठेवले. पाकिस्ताने पहिल्या डावात 408 धावा केल्या होत्या. न्यूझीलंडने चौथ्या दिवशी फक्त 3 षटकांचा खेळ शिल्लक असताना पाकिस्तानला फलंदाजीला पाचारण केले. विशेष म्हणजे किवींनी पाकिस्तानची या तीनच षटकात अवस्था 2 बाद 0 धावा अशी करत सामन्यावर पकड निर्माण केली.

हेही वाचा: PAK vs NZ : नावात गोंधळ घालणाऱ्या पाकिस्तानी समालोचकाला पॉर्नस्टार VIDEO शेअर करत म्हणाली...

पाकिस्तानने 319 धावांचे आव्हान घेऊन चौथ्या दिवशी आपला दुसरा डाव सुरू केला. पाकिस्तानला चौथ्या दिवशी फक्त तीन षटकेच खेळायचे होते. मात्र दमलेल्या पाकिस्तानला न्यूझीलंडने मुद्दाम फक्त 3 षटके खेळायला बोलवत त्यांना गोंधळात टाकले. ही रणनिती टीम साऊदी आणि इश सोधी यांनी वास्तवात आणली. टीम साऊदीने पहिल्या षटकाच्या दुसऱ्याच चेंडूवर सलामीवीर अब्दुल्ला शफीकचा शुन्यावर त्रिफळा उडवला.

या पहिल्या षटकात साऊदीने एकही धाव दिली नाही. त्यानंतर दुसरे षटक टाकणाऱ्या मॅट हेन्रीने देखील आपले षटक निर्धाव टाकले. त्यानंतर कर्णधार टीम साऊदीने एक मोठा डाव खेळला. त्याने दिवसाचे शेवटचे षटक स्वतः न घेता इश सोधीवर दाव लावला. त्यानेही मीर हामजाला दिवसाचा खेळ संपायला एकच चेंडू शिल्लक असताना शुन्यावर बोल्ड केले. त्यामुळे चौथ्या दिवसाचा खेळ संपला त्यावेळी पाकिस्तानची अवस्था 2.5 षटक 0 धावा अन् 2 विकेट्स अशी झाली. (Sports Latest News)

हेही वाचा: Arshdeep Singh : N, N4, N6, अर्शदीप सिंगचे षटक संपेना... हार्दिक जाम वैतागला

आता न्यूझीलंडला सामन्याच्या पाचव्या दिवशी पाकिस्तानच्या फक्त 8 विकेट्स घ्यायच्या आहेत. तर पाकिस्तानला सामना वाचवण्यासाठी संपूर्ण दिवस खेळून काढायचा आहे. किंवा सामना जिंकायचा असेल तर 319 धावांचे अवघड आव्हान पार करावे लागणार आहे. जर पाकिस्तान हा कसोटी सामना हरला तर त्यांच्यावर मायदेशात सलग दोन कसोटी मालिका गमावण्याची नामुष्की ओढवणार आहे. यापूर्वी इंग्लंडने पाकिस्तानचा 3 - 0 असा पराभव केला होता.

हेही वाचा : ...तर तुम्हालाही मिळू शकेल इन्कमटॅक्सचा जुना रिफंड