PAK vs NZ : नावात गोंधळ घालणाऱ्या पाकिस्तानी समालोचकाला पॉर्नस्टार VIDEO शेअर करत म्हणाली... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pakistan Vs New Zealand Karachi Test
#DaniDaniels ने थेट व्हिडिओच शेअर केला अन् #PAKvsNZ #PakistaniCommentator #DaniDaniels #DannyMorrison

PAK vs NZ : नावात गोंधळ घालणाऱ्या पाकिस्तानी समालोचकाला पॉर्नस्टार VIDEO शेअर करत म्हणाली...

Pakistan Vs New Zealand Karachi Test : पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात कराची येथे दुसरी कसोटी सुरू आहे. या कसोटीदरम्यान, पाकिस्तानच्या समालोचकाने एक मोठा गोंधळ घातला. त्यांनी न्यूझीलंडचे समालोचक डॅनी मॉरिसन यांचा उल्लेख करण्याऐवजी पॉर्नस्टार डॅनी डॅनियल्सचा उल्लेख केला. यानंतर सोशल मीडियावर पाकिस्तानचे समालोचक चांगलेच ट्रोल होऊ लागले. आता तर खुद्द पॉर्नस्टार डॅनी डॅनियल्सने यावर प्रतिक्रिया देत आगीत तेल ओतण्याचे काम केले.

हेही वाचा: David Warner : दिल्लीला मिळणार आयपीएल जिंकून देणारं नेतृत्व; पंतच्या जागी सर्फराज करणार...

पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील कसोटी एका गंभीर वळणावर आली होती. न्यूझीलंडच्या शेवटच्या विकेटने मॅट हेन्री आणि एजाझ पटेल यांनी शतकी भागीदारी केली होती. अशातच पाकिस्तानच्या समालोचकाने न्यूझीलंडचे समालोचक डॅनी मॉरिसन यांचा उल्लेख डॅनी डॅनियल्स असा केला. डॅनी डॅनियल्स ही एक पॉर्न स्टार आहे.

या गोंधळानंतर सोशल मीडियावर पाकिस्तानचे समालोचक बाझिद खान चांगलेच ट्रोल होऊ लागले. सोशल मीडियावर ट्रेंड सुरू झाल्यानंतर पॉर्नस्टार डॅनी डॅनियल्सने देखील यात उडी घेती आगीत तेल ओतले. तिने व्हिडिओ शेअर करत फक्त 'Put me in coach!' असे कॅप्शन दिले. (Sports Latest News)

हेही वाचा: Shakib Al Hasan BPL : फक्त एका महिन्यात सुतासारखं सरळ करतो! शाकिबचे व्यवस्थापनाला आव्हान

पाकिस्तान - न्यूझीलंड कसोटीबाबत बोलायचे झाले तर न्यूझीलंडने दुसऱ्या डावात 5 बाद 277 धावा करत पाकिस्तानसमोर विजयासाठी 319 धावांचे आव्हान ठेवले. पाकिस्ताने पहिल्या डावात 408 धावा केल्या होत्या. चौथ्या दिवसअखेर न्यूझीलंडने पाकिस्तानची अवस्था 2 बाद शून्य धावा अशी करत सामन्यावर पकड निर्माण केली.

न्यूझीलंडला सामन्याच्या पाचव्या दिवशी पाकिस्तानच्या फक्त 8 विकेट्स घ्यायच्या आहेत. तर पाकिस्तानला सामना वाचवण्यासाठी संपूर्ण दिवस खेळून काढायचा आहे. किंवा सामना जिंकायचा असेल तर 319 धावांचे अवघड आव्हान पार करावे लागणार आहे.

हेही वाचा : ...तर तुम्हालाही मिळू शकेल इन्कमटॅक्सचा जुना रिफंड