Video : पाकिस्तानी क्रिकेटपटू म्हणाला, 'जय श्रीराम'; भारतीय म्हणाले...

Danish-Kaneria
Danish-Kaneria

दानिश कनेरिया प्रकरणी दररोज नव्याने माहिती पुढे येत आहे. याबाबत कुणी ना कुणीतरी आपल्या प्रतिक्रिया नोंदवत आहे. पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू जावेद मियाँदाद, माजी कर्णधार इंजमाम-उल-हक आणि भारताचा माजी सलामीवीर आणि भाजप खासदार गौतम गंभीरने आपली प्रतिक्रिया नोंदविली आहे. 

दानिश कनेरियाने आपल्या यू-ट्यूब चॅनेलवर अपलोड केलेल्या एका व्हिडिओमध्ये 'जय श्रीराम' म्हटले आहे. रविवारी अपलोड केलेल्या व्हिडिओची सुरवात दानिशने 'जय श्रीराम' म्हणत केली. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात सध्या तुफान व्हायरल होत आहे. अनेक भारतीय क्रिकेटप्रेमींनी त्याला पाठिंबा देत पूर्ण भारत तुझ्यासोबत आहे, असे म्हटले आहे. मात्र, याआधीही दानिशने अपलोड केलेल्या व्हिडिओमध्ये जय श्रीराम म्हटले होते. 

दानिशचे नाव दिनेश होते?

दानिश कनेरिया हा पाकिस्तानकडून खेळणारा दुसरा हिंदू क्रिकेटपटू ठरला. पाकिस्तानतर्फे खेळण्यासाठी तुला नाव बदलण्यास सांगितले होते का? तुझे नाव दिनेश होते का? असे प्रश्न अनेक क्रिकेट चाहत्यांनी दानिशला विचारले. आपल्या नावाबद्दल विचारणा झाल्यानंतर दानिशने याबाबतचा खुलासा केला आहे. 

तो म्हणाला, मी कधी माझे नाव बदलले नाही. माझ्या वडिलांच्या एका मित्राने मला लेग स्पिन बॉलिंग करताना पाहिले होते. तेव्हा त्यांनी माझे नाव दानिश ठेवले. दानिश हे एक फारसी भाषेतील नाव आहे. 

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाबाबत (पीसीबी) बोलताना दानिश म्हणाला, ''2010 मध्ये जेव्हा माझे नाव स्पॉट फिक्सिंगमध्ये आले होते, तेव्हा मी पीसीबीला कॉल करून माझी मदत करण्याची विनंती केली होती. मात्र, त्यांनी हा तुझा वैयक्तिक प्रश्न असल्याने आम्ही तुझी मदत करू शकत नाही, असे उत्तर दिले होते. मी पीसीबीला सर्वात जास्त महत्त्व देत होतो. मला वाटले होते की, अडचणीच्या काळात पीसीबी माझ्या पाठीशी उभी राहिल. त्यानंतर मी सगळे आरोप मान्य केले. त्यामुळे स्पॉट फिक्सिंगमध्ये आणखी जे खेळाडू अडकले आहेत, त्यांची ज्या प्रकारे पीसीबी मदत करत आहे. तशीच मदत मलादेखील करावी,'' असे मला वाटत होते. 

दानिशच्या खुलाशानंतर पाकिस्तानमध्ये खळबळ
शोएब अख्तरने केलेल्या गौप्यस्फोटानंतर दानिशने आपली प्रतिक्रिया नोंदवली आणि पाकिस्तानमध्ये खळबळ सुरू झाली. पाकिस्तान संघातील काही खेळाडू मी हिंदू असल्याने माझ्याशी गैरवर्तन करत होते, असे दानिशने म्हटले होते.

शोएबने मारली पलटी

दानिश हा हिंदू असल्याने पाकिस्तान संघातील इतर खेळाडू त्याच्याशी गैरवर्तन करत असल्याचा धक्कादायक खुलासा पाकचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने केले होते. त्यानंतर या प्रकरणाला सुरवात झाली. सोशल मीडियात अनेक उलटसुलट चर्चा झाल्यानंतर शोएबने रविवारी (ता.29) माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आल्याचे म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com