जगज्जेता पंकज अडवाणी बिलियर्डस निवडणुकीत पराभूत

वृत्तसंस्था
सोमवार, 25 मार्च 2019

बंगळूर, ता. 24 : पंकज अडवाणीस भारतीय बिलियर्डस्‌ आणि स्नूकर महासंघाच्या निवडणुकीत हार पत्करावी लागली. महासंघाचे उपाध्यक्ष होण्यात अपयशी ठरल्यावर निवडणुकीत क्रीडासंहितेचा भंग झाल्याचा आरोप त्याने केला.

महासंघाच्या निवडणुकीत पंकज, तसेच आलोक कुमार हे भारताचे अव्वल आंतरराष्ट्रीय खेळाडू उपाध्यक्षपदासाठी उत्सुक होते. एकंदर दहा उमेदवार रिंगणात होते. सर्वोत्तम चौघांना पसंती मिळणार होती. पंकजला 13, तर आलोकला 11 मते मिळाली. पराभवानंतर पंकज, आलोक तसेच अन्य पराजित उमेदवारांनी महासंघाच्या निवडणूक प्रक्रियेवर टीका केली.

महासंघाचे सचिव एस बालसुब्रमण्यम हे कसे रिटर्निंग ऑफिसर होऊ शकतात. त्याचबरोबर मतदारांची यादीही सर्व उमेदवारांना देण्यात आली नाही. त्याचबरोबर महासंघातील अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, तसेच खजिनदार यांनी महासंघाची निवडणूक आठ महिने लांबवली. त्यास वार्षिक सभेची मंजुरी घेतली नव्हती, त्यामुळे क्रीडासंहितेचा भंग केल्याचा आरोप त्यांनी केला.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pankaj Adwani lost in billiards election