पेरू कर्णधार पाओलो गुएर्रेरोला विश्‍वकरंडक खेळण्याची परवानगी 

वृत्तसंस्था
शुक्रवार, 1 जून 2018

उत्तेजक सेवन चाचणीत अडकलेला पेरू फुटबॉल संघाचा कर्णधार पाओलो गुएर्रेरो याला गुरुवारी दिलासा मिळाला. उत्तेजक प्रकरणावर त्याच्यावर 14 महिन्यांची बंदी घालण्यात आली आहे.
 

झ्युरिच - उत्तेजक सेवन चाचणीत अडकलेला पेरू फुटबॉल संघाचा कर्णधार पाओलो गुएर्रेरो याला गुरुवारी दिलासा मिळाला. उत्तेजक प्रकरणावर त्याच्यावर 14 महिन्यांची बंदी घालण्यात आली आहे.

गुएर्रेरो याने आपल्यावरील बंदीचा विचार करावा, असे अपील केले होते. स्विस न्यायालयाने त्याची अपील स्वीकारत विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेच्या पार्श्‍वभूमीवर त्याच्यावरील बंदी तात्पुरती उठवण्याचा निर्णय घेतला आहे. गुएर्रेरो याला विश्‍वकरंडक खेळण्यापासून रोखल्यास त्याच्या कारकिर्दीशी खेळल्यासारखे होईल. त्यामुळे आम्ही हा निर्णय घेतला आहे. पेरू 36 वर्षांनी प्रथमच विश्‍वकरंडक स्पर्धेत खेळणार आहे. 
 

Web Title: Paolo Guerrero cleared to play at World Cup for Peru after doping ban frozen