Paris 2024 Olympics : पॅरिस ऑलिंपिकचे बिगुल वाजले; खराब हवामानामुळे पर्यायी ज्योत प्रज्वलित; 5 हजार किलोमीटरचा प्रवास सुरू

२६ जुलै ते ११ ऑगस्ट यादरम्यान फ्रान्समधील पॅरिस येथे ऑलिंपिक या जागतिक क्रीडा महोत्सवाची धूम पाहायला मिळणार आहे. या प्रतिष्ठेच्या क्रीडा स्पर्धांचे बिगुल मंगळवारी वाजले. ग्रीसच्या दक्षिणेकडे पॅरिस ऑलिंपिकची ज्योत प्रज्वलित करण्यात आली.
Paris 2024 Olympics date schedule know all details here
Paris 2024 Olympics date schedule know all details hereSakal

ऑलिंपिया (ग्रीस) : यावर्षी २६ जुलै ते ११ ऑगस्ट यादरम्यान फ्रान्समधील पॅरिस येथे ऑलिंपिक या जागतिक क्रीडा महोत्सवाची धूम पाहायला मिळणार आहे. या प्रतिष्ठेच्या क्रीडा स्पर्धांचे बिगुल मंगळवारी वाजले. ग्रीसच्या दक्षिणेकडे पॅरिस ऑलिंपिकची ज्योत प्रज्वलित करण्यात आली.

याप्रसंगी खराब हवामान असल्यामुळे पारंपरिक पद्धतीने ज्योत प्रज्वलित करण्यात अपयश आले. त्यामुळे पर्यायी ज्योतीचा अवलंब करण्यात आला. आता पाच हजार किलोमीटरचा प्रवास करून ही ज्योत अथेन्स येथे पॅरिस ऑलिंपिक आयोजकांच्या हातामध्ये सुपूर्द करण्यात येणार आहे. ११ दिवसांचा ज्योतीचा प्रवास २६ एप्रिल रोजी संपेल.

ऑलिंपिकची ज्योत दरवेळी पारंपरिक पद्धतीने प्रज्वलित करण्यात येते; पण यंदा हवामान ढगाळ होते. त्यामुळे ग्रीक महिला पुजाऱ्यांच्या हस्ते सूर्यकिरणच्या साहाय्याने या ज्योतीचे प्रज्वलन करता आले नाही. सोमवारी ज्योत प्रज्वलित करण्याची रंगीत तालीम घेण्यात आली होती. तीच ज्योत मंगळवारी प्रज्वलित करण्यासाठी वापरण्यात आली.

आता ही ज्योत ऑलिंपिया येथील मंदिरापासून क्रीडा मैदानांपर्यंत एकूण पाच हजारपेक्षा जास्त किलोमीटरचा प्रवास करणार आहे. ग्रीसचा रोईंगपटू स्टेफानोस नोसकोस याने टोकियो ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदक पटकावले होते. त्यामुळे त्याच्या हातामध्ये पहिल्यांदा ही ज्योत देण्यात आली.

१९३६पासून रिलेला सुरुवात

ऑलिंपिकचा पहिला मोसम ग्रीसमध्ये १८९६मध्ये पार पडला. तसेच १९२८मधील नेदरलँडस्‌ येथे पार पडलेल्या ऑलिंपिकमध्ये ज्योत प्रज्वलित करण्याचा विचार सुरू झाला. त्यानंतर १९३६मधील ऑलिंपिक जर्मनीतील बर्लिन येथे पार पडले. तिथपासून मशाल रिलेला सुरुवात झाली.

सध्या जगभरात युद्ध व संघर्ष सुरू आहे. नकारात्मक, क्रोध, आक्रमकता या बाबींमुळे सर्वसामान्य त्रस्त झाले आहेत. सर्वांना एकत्रित आणण्याच्या पर्यायाची वाट बघितली जात आहे. ऑलिंपिकमुळे एकजुटता निर्माण होऊ शकते.

-थॉमस बाक, अध्यक्ष, आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समिती

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com