सदाशिवराव मंडलिक माध्यमिक विद्यालयाच्या (Sadashivrao Mandlik Secondary School) विद्यार्थ्यांनी स्वप्नीलच्या दारात येऊन फोटो हातात घेऊन ‘भारत माता की जय’ असा जयघोष केला.
शिरगाव : पॅरिस आलिंपिकमध्ये कास्यपदक मिळवून महाराष्ट्रासह कोल्हापूर जिल्हा आणि राधानगरी तालुक्याचे नाव जगाच्या नकाशात कोरलेल्या कांबळवाडी (Kambalwadi) तालुक्यातील स्वप्नील सुरेश कुसाळेला (Swapnil Suresh Kusale) गुरुवारी भारत सरकारतर्फे क्रीडा क्षेत्रातील मानाचा अर्जुन पुरस्कार (Arjuna Award) आणि त्याच्या गुरू दीपाली देशपांडे यांना द्रोणाचार्य पुरस्कार जाहीर होताच कांबळवाडीसह परिसरात क्रीडाप्रेमींनी जल्लोष केला.