

Manu Bhaker Networth : सध्या देशात सर्वत्र पॅरिस ऑलिंम्पिक २०२४ ची चर्चा आहे. भारताने नुकतेच ऑलिंम्पिकमध्ये पदकाचे खाते उघडले असून, मनू भाकरने भारतासाठी कांस्यपदक जिंकले आहे. यंदाच्या ऑलिंम्पिकमध्ये पहिले पदक जिंकण्याचा मान मनूने पटकावला. तिने १२ वर्षांचा नेमबाजीचा दुष्काळ महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात कांस्यपदक जिंकून संपवला.
अवघ्या २२ वर्षांची असलेली मनू भाकर तिच्या या अप्रतिम कामगिरीमुळे जगभरात प्रसिद्ध झाली आहे. युवा नेमबाज मनू भाकरने वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षी क्रीडा विश्वात मोठे स्थान निर्माण केले आहे. विशेष म्हणजे २०१८ पासून ती आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतासाठी पदके जिंकत आहे.
तिने आयएसएसएफ विश्वचषकाशिवाय, राष्ट्रकुल स्पर्धेतही उत्तम कामगिरी बजावत पदके जिंकली आहेत. मनू आता तरूण वयातच करोडपती झाली आहे. तिची एकूण संपत्ती किती? चला तर मग जाणून घेऊयात.
काही रिपोर्ट्सनुसार, मनू भाकरची एकूण संपत्ती तब्बल १२ कोटी रूपये आहे. यामध्ये तिच्या टूर्नामेंटचे पैसे, बक्षिसाची रक्कम, प्रायोजकत्व आणि समर्थन यांचा समावेश आहे. महत्वाची बाब म्हणजे मनूची सोशल मीडियावर मोठी लोकप्रियता असून, इन्स्टाग्रामवर तिचे २ लाख फॉलोअर्स आहेत तर एक्स (X) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तिचे १.५ लाख फॉलोअर्स आहेत. भारतात शूटिंगची ‘पोस्टर गर्ल’ म्हणून आता मनूचा उल्लेख केला जात आहे.
मनू भाकर ही हरियाणा राज्यातील झज्जर जिल्ह्यातील रहिवासी असून तिच्यावर आता बक्षिसांचा वर्षाव केला जात आहे. यापूर्वी तिने कॉमनवेल्थ गेम्समध्ये पदक जिंकल्यानंतर तिला हरियाणा सरकारने २ कोटी रूपये दिले होते.
त्याचवेळी स्पर्धा जिंकल्यानंतर तिला बक्षिसांची भरपूर रक्कम देखील मिळाली होती. मनू भाकरला OG Q ही कंपनी स्पॉन्सर करते. ही कंपनी तिच्या प्रशिक्षणाचा आणि स्पर्धेच्या प्रशिक्षणाच खर्च ही उचलते. उल्लेखनीय बाब म्हणजे मनू भारत सरकारच्या ‘लक्ष्य ऑलिंम्पिक पोडियम’ स्किमचा देखील एक महत्वाचा भाग आहे.
पॅरिस ऑलिंम्पिकमध्ये मनूवर एकूण १.६८ कोटी रूपये खर्च करण्यात आले आहेत. हे पैसे तिच्या पिस्तूल, पॅलेट्स आणि गोळ्यांच्या सर्व्हिसिंगसाठी खर्च करण्यात आले आहेत. या व्यतिरिक्त जर्मनीतील एका खासगी प्रशिक्षकाकडे तिच्या प्रशिक्षणासाठी ही पैसे खर्च करण्यात आले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.