

U Mumba vs Patna Pirates
Sakal
प्रो कबड्डी लीग २०२५ स्पर्धेतील प्ले -इन्स २ फेरीतील सामना यू मुंबा आणि पटना पायरेट्स या दोन्ही संघांमध्ये पार पडला. त्यागराज इनडोअर स्टेडियममध्ये पार पडलेल्या या सामन्यात पटना पायरेट्स संघातील खेळाडूंनी दमदार कामगिरी केली.
यासह यू मुंबावर ४०- ३१ गुणांसह ९ गुणांनी विजय मिळवला. या विजयासह पटना पायरेट्सने एलिमिनेटर १ फेरीत प्रवेश केला आहे. या फेरीत पटना पायरेट्सचा सामना जयपूर पिंक पँथर्स संघाविरुद्ध होणार आहे.