U Mumba beats Jaipur Pink Panthers by 1 point
esakal
प्रो कबड्डी लीग २०२५ स्पर्धेत मंगळवारी पार पडलेल्या सामन्यात जयपूर पिंक पँथर्स आणि यू मुंबा हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात दोन्ही संघांमध्ये अटीतटीची लढत पाहायला मिळाली. शेवटी यू मुंबाने हा सामना ३७- ३६ गुणांसह शेवटच्या चढाईत अवघ्या १ गुणाने आपल्या नावावर केला. यासह विजयाची हॅट्ट्रिक करत टॉप ४ मध्ये प्रवेश केला.