Arjun Tendulkar: अर्जुनच्या बॅटला लागला गंज! सचिनच्या लेकाचं करियर सुरू होताच संपणार? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Arjun Tendulkar Ranji Trophy

Arjun Tendulkar: अर्जुनच्या बॅटला लागला गंज! सचिनच्या लेकाचं करियर सुरू होताच संपणार?

Arjun Tendulkar Ranji Trophy : दिग्गज सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर रणजी ट्रॉफीमध्ये गोव्याचे प्रतिनिधित्व करत आहे. राजस्थानविरुद्ध शतक झळकावून आपल्या रणजी ट्रॉफी कारकिर्दीची शानदार सुरुवात करणाऱ्या अर्जुनला फलंदाजीत आपला फॉर्म कायम राखता आलेला नाही. आपल्या संस्मरणीय पदार्पणापासून अर्जुन तेंडुलकर आपल्या फलंदाजीत एकापाठोपाठ एक डावात सातत्याने फ्लॉप होत आहे.

हेही वाचा: IND vs Sl: लंकेचा कर्णधार शनाका 'गोरा असता तर IPL मध्ये पडला असता पैशांचा पाऊस'

राजस्थानविरुद्ध शतक झळकावल्यानंतर अर्जुन तेंडुलकर झारखंडविरुद्धच्या पुढील सामन्यात 1 धावांवर बाद झाला. यानंतर बलाढ्य कर्नाटक संघाविरुद्ध अर्जुन पहिल्याच चेंडूवर गोल्डन डक म्हणजेच 0 धावांवर बाद झाला. केरळविरुद्धही त्याचा संघर्ष सुरूच राहिला आणि तो अवघ्या 6 धावांवर बाद झाला.

अर्जुन तेंडुलकरने रणजी ट्रॉफीच्या पदार्पणात शतक झळकावून आपल्या सुवर्ण भविष्याच्या आगमनाचे संकेत दिले होते. पण एका डावानंतरच तो गडबडलेला दिसत आहे. अर्जुन तेंडुलकरच्या शतकानंतर युवराज सिंगचे वडील आणि माजी भारतीय खेळाडू योगराज सिंग यांनी याचे श्रेय घेतले होते.

हेही वाचा: IND vs SL: 'ऑल इज वेल...', दुखापतीमुळे बाहेर पडलेल्या संजूच्या पोस्टमुळे चाहते कन्फ्यूज?

योगराज सिंगच्या देखरेखीखाली अर्जुनच्या फलंदाजीत सुधारणा झाली. योगराज सिंग यांनी तर सांगितले होते की, अर्जुनला मी जागतिक क्रिकेटमधील सर्वोत्तम माणूस बनवेल. अशा परिस्थितीत अर्जुन तेंडुलकरच्या फ्लॉप शोवर योगराज सिंहची प्रतिक्रिया काय असते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

दुसरीकडे सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, केरळविरुद्ध 8व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या अर्जुनला अनुभवी फिरकी गोलंदाज जलज सक्सेनाने बाद केले. अर्जुनच्या विकेटने गोव्याला अडचणीत आणले. मात्र यानंतर अखेर मोहित रेडकरने 42 चेंडूत 37 धावांची खेळी करत बॅटने सुरेख हात दाखवला.