
India-Pakistan: बीसीसीआयच्या महाराजाला 'राजी' करण्यासाठी रमीझ राजांची धडपड
कराची : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (Pakistan Cricket Board) सचिव रमीझ राजा (Ramiz Raja) भारत, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील चौरंगी मालिका (Four-Nation ODI Tournament) खेळवण्यासाठी फारच उत्सुक आहेत. मात्र पीसीबीचा रिकाम्या तिजोरीला आधार देण्याच्या रमीझ राजांच्या ड्रीम प्रोजेक्टवर बीसीसीआयने (BCCI) सकारात्मक प्रतिक्रिया दिलेली नाही. दरम्यान, रमीझ राजा यांनी आता या विषयाबाबत बीसीसीआयचे अध्यक्ष सौरभ गांगुलीला (Sourav Ganguly) भेटणार आहेत. ही भेट आशियाई क्रिकेट काऊन्सिलच्या 19 मार्च रोजी दुबईत होणाऱ्या बैठकीवेळी होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा: स्मृती मानधनाच्या अफेअरची चर्चा, म्युझिक डायरेक्टरला करतीये डेट?
रमीझ राजा यांनी याबाबत बोलताना सांगितले की, 'मी चौरंगी मालिकेबाबत सौरभ गांगुलीशी दुबईतील एसीसी बैठकीवेळी बोलणार आहे. आम्ही दोघेही माजी कर्णधार आणि खेळाडू आहोत. आमच्यासाठी क्रिकेट (Cricket) हा राजकारणाचा विषय नाही. जरी या प्रस्तावाबाबत भारताने नकारघंटा वाजवली तरी आम्ही प्रत्येक वर्षी ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यातील तिरंगी मालिका सुरू करण्याबाबत विचार करू.'
रमीझ राजा यांना भारत आशिया कप खेळण्यासाठी पुढील वर्षी पाकिस्तानमध्ये येईल असा विश्वासही व्यक्त केला आहे. ते म्हणाले की, 'मला असे वाटते की ते पाकिस्तानात येतील जर ते पाकिस्तानमध्ये आले नाहीत तर काय करायचे हे आम्ही ठरवू.'
हेही वाचा: Record : रोहितची कॅप्टन्सी हिट, पण बॅटिंगमध्ये कोहलीपेक्षाही फ्लॉप
बीसीसीआय सचिव जय शहा यांनी रमीझ राजा यांचा चौरंगी मालिकेचा प्रस्ताव या आधीच फेटाळला आहे. भारत खेळाच्या जागतिकरणाच्या बाजूचा आहे मात्र कोणत्याही आर्थिक फायद्याच्या बाजूचा नाही असे त्यांनी स्पष्ट केले होते. यंदाचा आशिया कप टी 20 फॉरमॅटमध्ये श्रीलंकेत खेळवण्यात येणार आहे. याबाबतचे वेळापत्रक दुबईतील बैठकीनंतर जाहीर होण्याची शक्यता आहे. ही स्पर्धा ऑस्ट्रेलियात ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या आयसीसी टी 20 वर्ल्डकपपूर्वी होण्याची शक्यता आहे.
Web Title: Pcb Chairman Ramiz Raja Will Meet Sourav Ganguly For Four Nation Odi Tournament
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..