Najam Sethi : याला घ्या.. त्याला घ्या.. वशिला तेवढा लावू नका; PCB अध्यक्षांचे ट्विट व्हायरल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

PCB Chairmen Najam Sethi

Najam Sethi : याला घ्या.. त्याला घ्या.. वशिला तेवढा लावू नका; PCB अध्यक्षांचे ट्विट व्हायरल

PCB Chairmen Najam Sethi : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे चेअरमन हे आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे कायम प्रसिद्धीझोतात राहतात. यापूर्वी रमीझ राजा यासाठी ओळखले जात होते. डिसेंबरमध्ये नजम सेठी यांनी रमीज राजांना पदच्युत करत पीसीबी चेअरमनपदावर विराजमान झाले. मात्र त्यांनी रमीझ राजांचा वादग्रस्त्र विधानांचा वारसा पुढे सुरूच ठेवला आहे. नजम सेठी यांनी नुकतेच एक ट्विट केले आहे. हे ट्विट तुफान व्हायरल होत आहे.

हेही वाचा: Wrestler Protest : ऑलिम्पिक पदक विजेत्या बॉक्सर विजेंदर सिंहला स्टेजवरून उतरवले खाली?

सेठी यांनी ट्विट करत आपल्या मित्रांना वशिला लावू नका अशी विनंती केली. ते ट्विट म्हणतात की, 'मी माझ्या मित्रांना आणि वरिष्ठांना एक वैयक्तिक विनंती करतो की पाकिस्तान सुपर लीगच्या सामन्यांचे मोफत पासेस आणि तिकिट मागू नका. पीसीबीचे ऑडिट करणाऱ्या संसदेच्या पब्लिक अकाऊंट कमिटीने आम्हाला अशा प्रकारची व्यवस्था निर्माण करण्यापासून सावध राहण्याचा सल्ला दिला आहे.'

सेठी यांनी या ट्विटला जोडूनच दुसरे ट्विट केले की, 'मी माझ्या मित्रांना आणि वरिष्ठांना जे पात्र नाहीत अशा खेळाडूंची किंवा कोचची निवड करण्यासाठी, नोकरी लावण्यासाठी वशिला लावू नका अशी विनंती करतो. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला जगातील सर्वोत्तम संस्थांशी स्पर्धा करायची आहे त्यामुळे अपात्र लोकं आपल्याला परवडणार नाहीत.' नजम सेठींच्या या ट्विटमधील सर्वोच्च संस्था ही बीसीसीआय आहे अशी चर्चा सुरू आहे.

हेही वाचा: Ricky Ponting Rishabh Pant : पॉटिंगने पंतच्या IPL समावेशाबाबत केले मोठे वक्तव्य; जर तो आमच्यासोबत...

नजम सेठी हे नुकतेच एशियन क्रिकेट काऊन्सीलच्या अधिकाऱ्यांशी युएईमध्ये भेटले अशी माहिती मिळत आहे. एएनआयने दिलेल्या माहितीनुसार नजम यांना जय शहा यांना भेटण्याची इच्छा होती. पाकिस्तान आशिया कप 2023 चे यजमान पद मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहे. जय शहा यांनी गेल्या वर्षी आशिया कप त्रयस्थ ठिकाणी खेळवण्यात येण्यााबाबत वक्तव्य केले होते.

हेही वाचा : मेडिकल मॅनेजमेंटही हृदयविकारावर ठरु शकते उपाय

टॅग्स :BCCIPCB Chairman