World Cup 2023 IND vs PAK
World Cup 2023 IND vs PAK esakal

World Cup 2023 Najam Sethi : नजम सेठींचे सरकारकडे बोट.. पाकिस्तान पुन्हा करतोय नाटकं

World Cup 2023 Najam Sethi IND vs PAK : भारताने आशिया कपसाठी पाकिस्तानचे हयब्रीड मॉडेल स्विकारल्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आपले खरे रंग दाखवण्यास सुरूवात केली आहे. पीसीबीचे अध्यक्ष नजम सेठी यांनी भारतात होणाऱ्या वनडे वर्ल्डकपमध्ये सहभागी होण्याबाबत घुमजाव केलं आहे. नजम सेठी यांनी भारतात होणाऱ्या वनडे वर्ल्डकपसाठी पाकिस्तानचा संघ पाठवायचा का नाही याचा निर्णय सरकारच्या अधीन अल्याचे सांगितले.

World Cup 2023 IND vs PAK
WI vs IND : वेस्ट इंडिज दौऱ्यावर रोहित शर्माचा पत्ता कट? अजिंक्य रहाणे पुन्हा होणार कर्णधार

नुकतेच एशियन क्रिकेट काऊन्सीलचे प्रमुख जय शहा यांनी पाकिस्तानने आशिया कपसाठी सादर केलेले हायब्रीड मॉडेल स्विकारले होते. मात्र सातत्याने भारतीय पाकिस्तान क्रिकेट बोर्ड हे भारतात होणाऱ्या वनडे वर्ल्डकपमध्ये आपला संघ न पाठवण्याची धमकी देत होता. आता पाकिस्तानच्या मनासारखं झालं तरी पाकिस्तान नखरे करताना दिसतोय. पीसीबी चेअमन नजम सेठींनी घेतलेल्या आडमुठ्या भुमिकेमुळे आयसीसीला वर्ल्डकपच्या वेळापत्रकावर अंतिम शिक्कामोर्तब करण्यात अडचणी येण्याची शक्यता आहे.

पाकिस्तान सरकार ठरवणार

रमीझ राजा हे पीसीबीच्या अध्यक्षपदापासून दूर झाल्यानंतर नजम सेठी हे नवे पीसीबी प्रमुख बनले होते. नजम सेठी यांनी भारतात होणाऱ्या वनडे वर्ल्डकपमध्ये पाकिस्तान संघ खेळणार की नाही याबाबत नवे वक्तव्य केले. ते म्हणाले की, 'भारत आणि पाकिस्तान यांच्याबद्दल बोलायचं झालं तर याबाबत पीसीबी आणि बीसीसीआय दोघेही निर्णय घेऊ शकत नाहीत. याबाबत संबंधित सरकार निर्णय घेते. आता भारतात वर्ल्डकप खेळण्यासाठी पाकिस्तानचा संघ पाठवायचा की नाही हे आमचे सरकार ठरवेल. ज्यावेळी भारताचा विषय येतो त्यावेळी देखील याबाबतचे निर्णय त्यांचे सरकार घेते.

World Cup 2023 IND vs PAK
ENG vs AUS : कांगारूं संघाने प्लेइंग-11 मध्ये केला मोठा बदल! दिग्गज खेळाडूला दिला डच्चू

नजम सेठी पुढे म्हणाले की, 'आम्हाला तुम्ही अहमदाबादमध्ये खेळणार का असे विचारून काही उपयोग नाही. वेळ आल्यावर आम्ही जाणार की नाही हे निश्चित होईल. यानंतर सरकार ठरवेल की आम्हाला कुठं खेळायचं आहे कुठं नाही. आमचा निर्णय या दोन महत्वपूर्ण अटींवर अवलंबून आहे.

भारतात ऑक्टोबर - नोव्हेंबर मध्ये होणार वनडे वर्ल्डकप

भारतात ऑक्टोबर - नोव्हेंबरमध्ये वनडे वर्ल्डकप खेळला जाणार आहे. संभाव्य वेळापत्रकानुसार ही स्पर्धा 5 ऑक्टोबर पासून सुरू होणार आहे. तर फायनल 19 नोव्हेंबरला होईल. या वेळापत्राकानुसार 15 ऑक्टोबरला भारत पाकिस्तान यांच्यातील हाय व्होल्टेज सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. मात्र याची अधिकृत घोषणा अजून झालेली नाही. पाकिस्तानचा संघ 2016 मध्ये शेवटचा भारतात खेळला होता. त्यावेळी भारत टी 20 वर्ल्डकपचे आयोजन करत होता.

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com