WI vs IND : वेस्ट इंडिज दौऱ्यावर रोहित शर्माचा पत्ता कट? अजिंक्य रहाणे पुन्हा होणार कर्णधार

Rohit Sharma | Ajinkya Rahane
Rohit Sharma | Ajinkya Rahane

WI vs AUS Rohit Sharma : भारतीय संघाला वर्ल्ड चॅम्पियनशिप मधील पराभव विसरून पुढे जायचे आहे. संघ पुढील महिन्यात वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाणार असून तेथे कसोटीसह एकदिवसीय आणि टी-20 मालिका खेळणार आहे. या कसोटी मालिकेसह टीम इंडिया पुढील कसोटी चॅम्पियनशिप सायकल सुरू करेल. पण या दौऱ्यावर रोहित शर्मा काही सामन्यांमध्ये दिसणार नाही. त्यांना विश्रांती दिली जाऊ शकते.

Rohit Sharma | Ajinkya Rahane
ENG vs AUS : कांगारूं संघाने प्लेइंग-11 मध्ये केला मोठा बदल! दिग्गज खेळाडूला दिला डच्चू

वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा 27 जून रोजी केल्या जाऊ शकते. टीम इंडिया वेस्ट इंडिज दौऱ्यावर दोन कसोटी सामने, तीन एकदिवसीय आणि पाच टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. त्याची सुरुवात 12 जुलैपासून डॉमिनिकमध्ये खेळल्या जाणाऱ्या कसोटी सामन्याने होईल. दुसरा कसोटी सामना त्रिनिदाद येथे होणार आहे.

Rohit Sharma | Ajinkya Rahane
IND vs WI: रोहितसह बड्या खेळाडूंना विश्रांती, वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी लवकरच टीम इंडियाची घोषणा

रोहितला विश्रांती, रहाणेला कमांड

टाईम्स ऑफ इंडिया या इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, या दौऱ्यात रोहितला काही सामन्यांमध्ये विश्रांती दिली जाऊ शकते. रोहित आयपीएल आणि कसोटी चॅम्पियनशिपदरम्यान थकलेला दिसत आहे. त्यामुळे त्याला वेस्ट इंडिज दौऱ्यावर काही सामन्यांसाठी विश्रांती दिली जाऊ शकते. या प्रकरणी निवडकर्ते रोहितशी चर्चा करतील आणि त्यानंतर निर्णय घेतील, असे अहवालात लिहिले आहे.

रोहितला कसोटीत विश्रांती दिल्यास नुकतेच संघात परतलेल्या रहाणेची कर्णधारपदी नियुक्ती केली जाऊ शकते, असेही या अहवालात सांगण्यात आले आहे. राहाणे याआधी टीम इंडियाचे कर्णधारपद भूषवत आहे. तो संघाचा उपकर्णधार होता पण खराब फॉर्ममुळे त्याला वगळण्यात आले. त्याने कसोटी चॅम्पियनशिपमध्ये पुनरागमन करत पहिल्या डावात 89 धावा करत संघाला सांभाळले तर दुसऱ्या डावात 43 धावा केल्या.

पुजाराचे काय होणार?

टीम इंडियाच्या फलंदाजीचा धुरा समजला जाणारा चेतेश्वर पुजारा कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत अपयशी ठरला. संघात त्याच्या जागा धोक्यात आहे पण रोहित आणि विराट कोहलीला विश्रांती दिल्यास पुजाराला आणखी एक संधी मिळू शकते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com