Shahid Afridi: महिन्याभरातच आफ्रिदीला डच्चू; PCB अध्यक्ष नजम सेठींचा मोठा निर्णय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shahid Afridi

Shahid Afridi: महिन्याभरातच आफ्रिदीला डच्चू; PCB अध्यक्ष नजम सेठींचा मोठा निर्णय

Shahid Afridi : गेल्या काही महिन्यांपासून पाकिस्तान क्रिकेटमधील भूकंप थांबताना दिसत नाही. संघाच्या पराभवाच्या मालिकेदरम्यान नवनवीन वाद चव्हाट्यावर येत होते. दरम्यान, पाकिस्तान सरकारने 21 डिसेंबरला रमीझ राजाला हाकल्यानंतर क्रिकेटच्या घडामोडींवर लक्ष ठेवण्यासाठी 14 सदस्यीय व्यवस्थापन समिती स्थापन केली होती. नजम सेठी यांच्या अध्यक्षतेखालील समितीमध्ये शाहिद आफ्रिदीचाही समावेश होता.

पीसीबीचे अध्यक्ष बनताच सेठीने पहिली गोष्ट केली ती म्हणजे आफ्रिदीला हंगामी मुख्य निवडकर्ता बनवणे. एकदिवसीय विश्वचषकापर्यंत आफ्रिदी या भूमिकेत राहील, असे मानले जात होते, परंतु महिनाभरातच सेठीला आफ्रिदी डच्चू देत आहे.(PCB Likely to Announce Chief Selector Shahid Afridi Replacement)

हेही वाचा: IND vs NZ: नंदीच्या कानात सुर्यकुमार यादव बोला नवस; पंतला लवकर...

पीसीबीची सोमवारी लाहोरमधील गद्दाफी स्टेडियमवर बैठक होणार आहे. यामध्ये आफ्रिदीच्या जागी नवीन मुख्य निवडकर्त्याच्या नावाची घोषणा केली जाऊ शकते. याशिवाय आशिया चषक, कोचिंग स्टाफ आणि देशांतर्गत क्रिकेटबाबतही निर्णय घेतले जातील. शाहिद आफ्रिदीला नजम सेठी यांची निवड मानली जात आहे.

माजी कर्णधाराला मोठी जबाबदारी दिल्यानंतर सेठीनेही अनेकवेळा त्याच्या कामाचे कौतुक केले. पण आता आफ्रिदीने केवळ अंतरिम मुख्य निवडकर्त्यापासूनच नाही तर 14 सदस्यीय व्यवस्थापन समितीपासूनही दूर केले आहे. नजम सेठी आणि आफ्रिदी यांच्यातील खट्टू संबंधांची अनेक कारणे आहेत.

हेही वाचा: Ravindra Jadeja: पाच महिन्यानंतर आला अन् थेट कर्णधार झाला

पीसीबीचे अध्यक्ष नजम सेठी यांना पाकिस्तान क्रिकेट संघासाठी परदेशी प्रशिक्षक हवा आहे. देशाच्या माजी खेळाडूंवर तो कोणत्याही परिस्थितीत ही जबाबदारी देण्यास तयार नाही. मुख्य प्रशिक्षकासाठी व्यावसायिक व्यक्ती आवश्यक आहे आणि पाकिस्तानमध्ये यासाठी सक्षम कोणी नाही, असे सेठी यांचे मत आहे.