IND vs NZ: नंदीच्या कानात सुर्यकुमार यादव बोला नवस; पंतला लवकर... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

suryakumar yadav kuldeep yadav

IND vs NZ: नंदीच्या कानात सुर्यकुमार यादव बोला नवस; पंतला लवकर...

India vs New Zealand : तीन एकदिवसीय मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारताने न्यूझीलंडचा आठ गडी राखून पराभव केला. रायपूरमध्ये शनिवारी झालेल्या या सामन्यात विजय मिळवत टीम इंडियाने मालिकाही जिंकली. तिने आता मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी मिळवली आहे.

टीम इंडियाची नजर आता क्लीन स्वीपकडे आहे. मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना 24 जानेवारीला इंदूरमध्ये खेळल्या जाणार आहे. सामन्याच्या एक दिवस आधी भारतीय खेळाडूंनी उज्जैन येथील बाबा महाकालच्या दारात नतमस्तक झाले.

हेही वाचा: Kapil Dev: 'आजकाल वेगवान गोलंदाज फक्त 30 चेंडू...', टीम इंडियावर देव भडकले

राजा महाकालच्या दर्शनासाठी आलेल्या भारतीय खेळाडूंनी हर हर महादेवचा जयघोष केला. पहाटे 3 वाजता श्री महाकालेश्वर मंदिरात भस्म आरतीला उपस्थित राहून देवाचे दर्शन घेतले. उज्जैन प्रशासनाने क्रिकेटपटूंसाठी दर्शनाची विशेष व्यवस्था केली होती. या भव्य दर्शनादरम्यान, सूर्यकुमार यादव बाबांच्या लाडक्या नंदीच्या कानात बोलत होता.

हेही वाचा: Ravindra Jadeja: पाच महिन्यानंतर आला अन् थेट कर्णधार झाला

मंदिरातून बाहेर आल्यानंतर क्रिकेटर सूर्यकुमार यादव म्हणाला, 'आम्ही ऋषभ पंत लवकर बरा व्हावा यासाठी प्रार्थना केली. त्याचे पुनरागमन आमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. आमचा भाऊ बरा होऊ दे. आम्ही न्यूझीलंडविरुद्धची मालिका आधीच जिंकली आहे, आता इंदूरमध्ये होणाऱ्या अंतिम सामन्याची वाट पाहत आहोत.

ऋषभ पंत 31 डिसेंबर 2022 रोजी एका रस्ता अपघातात गंभीर जखमी झाला होता, जिथे तो थोडक्यात बचावला. उत्तराखंडमध्ये काही दिवस उपचार घेतल्यानंतर त्यांच्यावर मुंबईत शस्त्रक्रिया करण्यात आली. तो किमान एक वर्ष क्रिकेटच्या मैदानापासून दूर राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे.