Ravindra Jadeja: पाच महिन्यानंतर आला अन् थेट कर्णधार झाला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ravindra jadeja returns after five months to ranji trophy captaincy of saurashtra team

Ravindra Jadeja: पाच महिन्यानंतर आला अन् थेट कर्णधार झाला

Ravindra Jadeja : भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा काही दिवसांपासून दुखापतग्रस्त आहे. पण तब्बल पाच महिन्यांनी मैदानात परतण्यास तयार आहे. फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या बॉर्डर गावसकर ट्रॉफीसाठी जडेजा टीम इंडियाचा भाग आहे. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी जडेजा रणजी ट्रॉफीमध्ये खेळताना दिसणार असून तो सौराष्ट्र संघाचे कर्णधारपदही सांभाळणार आहे. (Ravindra Jadeja Returns After Five Months To Ranji Trophy Captaincy Of Saurashtra Team)

हेही वाचा: Parshavi Chopra: W, W, W, W... श्रीलंकेला नाचवणारी 16 वर्षाची पार्शवी चोप्रा आहे तरी कोण?

टीम इंडियाचा स्टार ऑलराऊंडर रवींद्र जडेजा बऱ्याच काळापासून क्रिकेटपासून लांब आहे, बीसीसीआयला अजूनही जडेजा पूर्णपेणे फिट झाला आहे की नाही याबाबत शंका असल्याचे दिसून आले. त्यामुळे बीसीसीआयने रविंद्र जडेजाला रणजी ट्रॉफी खेळण्याचे आदेश दिले. राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (NCA) रवींद्र जडेजाच्या फिटनेसवरही लक्ष ठेवणार आहे. त्याचबरोबर जडेजाही देशांतर्गत क्रिकेट खेळण्यास उत्सुक आहे.

हेही वाचा: IND vs NZ: टीम इंडियासाठी न्यूझीलंड बनली डोकेदुखी! आधी क्रिकेट मग हॉकीत तोडते भारताचे हृदय

रवींद्र जडेजा यापूर्वीही रणजीमध्ये सौराष्ट्र संघाकडून खेळला आहे. पण तो बऱ्याच काळानंतर त्या संघात खेळताना दिसणार असून ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेपूर्वी तो आपली लय शोधण्याचा प्रयत्न करेल. रणजी ट्रॉफीमध्ये 24 जानेवारीपासून सौराष्ट्र आणि तामिळनाडू यांच्यात सामना रंगणार आहे. या सामन्यात रवींद्र जडेजा सौराष्ट्र संघाचे कर्णधारपद सांभाळताना दिसणार आहे.

हेही वाचा: Kapil Dev: 'आजकाल वेगवान गोलंदाज फक्त 30 चेंडू...', टीम इंडियावर देव भडकले

गेल्या वर्षी रवींद्र जडेजाच्या गुडघ्याला दुखापत झाली होती आणि जवळपास पाच महिने तो मैदानाबाहेर होता. यामुळे तो 2022 च्या टी-20 विश्वचषकालाही मुकला. त्याचवेळी गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये बांगलादेशविरुद्धच्या मालिकेसाठी त्याच्या नावाची निवड करण्यात आली होती. मात्र, पूर्णपणे तंदुरुस्त नसल्यामुळे त्याला बाहेर पडावे लागले. पण जडेजा आता मैदानात परतण्यासाठी सज्ज दिसत असून रणजीमध्ये खेळल्यानंतर तो फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेत टीम इंडियात परतणार आहे.