कसोटी खेळायची नाही? आता करारबद्धच करत नाही जा

वृत्तसंस्था
गुरुवार, 8 ऑगस्ट 2019

विश्वकरंडकात झालेल्या पराभवानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्ड प्रत्येक आघाडीवर नवीन बदल करण्यास उत्सुक आहे. त्यांनी यापूर्वीच अख्ख्या कोचिंग स्टाफची हकालपट्टी करण्यात आली आहे. पीसीबीने आता नव्याने करारबद्ध केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. यामध्ये अनुभवी महंमद हफीज आणि शोएब मलिक यांना करारबद्ध केलेले नाही. 

इस्लामाबाद : विश्वकरंडकात झालेल्या पराभवानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्ड प्रत्येक आघाडीवर नवीन बदल करण्यास उत्सुक आहे. त्यांनी यापूर्वीच अख्ख्या कोचिंग स्टाफची हकालपट्टी करण्यात आली आहे. पीसीबीने आता नव्याने करारबद्ध केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. यामध्ये अनुभवी महंमद हफीज आणि शोएब मलिक यांना करारबद्ध केलेले नाही. 

मलिकने विश्वकरंडकानंतर एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली असून तो केवळ ट्वेंटी20 क्रिकेटमध्ये खेळणार आहे. हफीजनेसुद्धा कसोटी क्रिकेमधून नुकतेच निवृत्ती जाहीर केली आहे. 

पाकिस्तान संघाकून भविष्यात खेळणार असलेल्या आणि वर्षभरात चांगली कामगिरी केलेल्या खेळाडूंनाच करारबद्ध करण्याचा निर्णय पीसीबीने घेतला आहे. त्यामुळेच करारबद्ध केलेल्या 33 खेळाडूंची संख्या कमी करुन 19 वर आणण्यात आली आहे.

करारबद्ध केलेले खेळाडू

अ श्रेणी- बाबर आझम, सर्फराज अहमद आणि यासिर शहा

ब श्रेणी- असाद शफिक, अझहर अली, हॅरिस सोहेल, इमाम उल हक, महंमद अब्बास, शादाब खान, शाहीन शहा आफ्रिदी, वहाब रियाझ.

क श्रेणी- अबीद अली, हसन अली, फखर जमान, इमाद वसीम, महंमद आमीर, महंमद रिझवान, शान मसूद आणि उस्मान शिनवारी. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: PCB Remove Mohammad Hafeez and Shoaib Malik From Central Contracts