स्वातंत्र्यदिनी ऑलिम्पियन खेळाडूंचा लाल किल्यावर होणार खास सन्मान

स्वांतत्र्य दिनाच्या कार्यक्रमानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या निवासस्थानी सर्व खेळाडूंशी संवाद देखील साधणार आहेत.
Olympic Contingent
Olympic ContingentTwitter

जगातील मानाच्या स्पर्धेत देशाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या खेळाडूंना आणखी एक मान मिळणार आहे. टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांना (Olympic Contingent) पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वातंत्र्य दिनाच्या (Independence Day) कार्यक्रमाचे निमंत्रण देणार आहेत. लाल किल्ल्यावरील (Red Fort) पंतप्रधानांच्या भाषणावेळी ऑलिम्पिक स्पर्धेतील खेळाडू प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थितीत असतील. स्वांतत्र्य दिनाच्या कार्यक्रमानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आपल्या निवासस्थानी सर्व खेळाडूंशी संवाद देखील साधणार आहेत.

ऑलिम्पिकच्या इतिहासात पहिल्यांदाच 127 खेळाडूंनी वेगवेगळ्या क्रीडा प्रकारात भारताचे प्रतिनिधीत्व केल्याचे पाहायला मिळाले. आतापर्यंत झालेल्या स्पर्धेत भारताला केवळ दोन पदके मिळाली असून एक पदक निश्चित झाले आहे. गत रिओ ऑलिम्पिकच्या तुलनेत यंदा भारताच्या पदतालिकेत अधिक पदके असणार हे निश्चित आहे. कुस्तीसह भालाफेकमध्येही पदकाची अपेक्षा आहे.

Olympic Contingent
Olympics: समान गुण मिळवूनही सोनम मलिक पराभूत कशी?

वेट लिफ्टिंगमध्ये मीराबाई चानूने स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी रौप्य पदकाची कमाई केली. त्यानंतर पीव्ही सिंधूने कांस्य पदकावर नाव कोरले. रिओ ऑलिम्पिक पाठोपाठ टोकियोमध्ये सलग दुसऱ्यांदा पदक मिळवत सिंधूने नवा इतिहास रचला आहे. बॉक्सिंगमध्ये लवलीना बोरगोहेनने हिने सेमीफायनलमध्ये प्रवेश करुन पदक पक्के केले आहे.

Olympic Contingent
नेटकऱ्यांनो सुधरा; खेळाडूंच्या 'जातीचा खेळ' थांबवा रे!

पीटीआयच्या वृत्तानुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ऑलिम्पिक स्पर्धेत देशाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या खेळाडूंचे कौतुक केले आहे. यंदाच्या ऑलिम्पिक स्पर्धेत मोठ्या संख्येनं भारतीय खेळाडू ऑलिम्पिकसाठी पात्र ठरले. यातून खेळाडूंनी आपल्यातील क्षमता सिद्ध केली आहे. स्पर्धेतील यश-अपयशापेक्षाही त्यांच्या कामगिरीत झालेली सुधारणा महत्त्वाची आहे. कोरोनाच्या संकटाचा सामना करताना खेळाडूंनी केलेली कामगिरी दुर्लक्षित करता येणार नाही, अशा शब्दांत मोदींनी खेळाडूंचे कौतुक केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com