POCSO ACT : शाळेत दोन अल्‍पवयीन मुलींवर अत्‍याचार; क्रीडा शिक्षकावर पोक्‍सोअंतर्गत गुन्‍हा दाखल

फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात (Phaltan Rural Police Station) संबंधित शिक्षकाच्या विरोधात विनयभंग व पोक्सोअंतर्गत गुन्हा (POCSO ACT) दाखल करण्यात आला आहे.
POCSO Case Filed Against Sports Teacher
POCSO Case Filed Against Sports Teacheresakal
Summary

'ज्या ज्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली आहे, अशा मुली व पालकांनी कोणत्याही प्रकारची भीती न बाळगता ग्रामीण पोलिस ठाण्यात संपर्क साधा.'

साखरवाडी : फलटण तालुक्यातील ग्रामीण भागातील एका शाळेतील दोन अल्पवयीन मुलींवर त्याच शाळेतील क्रीडा शिक्षकाने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली असून, या प्रकरणी फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात (Phaltan Rural Police Station) संबंधित शिक्षकाच्या विरोधात विनयभंग व पोक्सोअंतर्गत गुन्हा (POCSO ACT) दाखल करण्यात आला आहे.

POCSO Case Filed Against Sports Teacher
राज्यातील 20 ते 22 आमदारांसोबत स्वत: बोललोय, ते कोठेही जाणार नाहीत; सतेज पाटलांनी दिली महत्त्वाची अपडेट

क्रीडा शिक्षक (Sports Teacher) तुषार एकनाथ मोहिते (वय ५०, रा. ७ सर्कल साखरवाडी, ता. फलटण) असे संशयिताचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, याप्रकरणी अत्याचार झालेल्या एका अल्पवयीन मुलीने (Minor Girls) काही दिवसांपूर्वी तिच्यावर संशयित क्रीडा शिक्षक मोहिते याने लैंगिक अत्याचार केल्याची घटना तिच्या मावस भावास सांगितली होती.

याबाबत संबंधित अल्पवयीन मुलीच्या मावस भावाने ता. ८ फेब्रुवारी रोजी ऑनलाइन ई तक्रार दाखल केली होती. त्‍यात दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची नोंद करण्यात आली होती. ऑनलाइन ई तक्रार दाखल होताच संशयित क्रीडा शिक्षक तुषार मोहिते हा शिक्षक फरारी झाला आहे.

POCSO Case Filed Against Sports Teacher
कर्नाटक विधानसभेत भाजपच्या 'जय श्रीराम'ला काँग्रेस आमदारांनी दिलं 'जय भीम'च्या घोषणेनं उत्तर

दाखल ऑनलाइन तक्रारीच्या अनुषंगाने याबाबत ग्रामीण पोलिस ठाण्यात ता. १० फेब्रुवारी रोजी तक्रार दाखल करण्यात आली असून, यामध्ये एका शाळेत इयत्ता १० वी मध्ये शिकत असलेली अल्पवयीन मुलीवर डिसेंबर २०२३ (नक्की तारीख नमूद नाही) सायंकाळी ५ ते ६ दरम्यान शाळेच्या आवारामधील जिमच्या खोलीमध्ये व्यायाम करण्यासाठी गेली असता पी. टी. शिक्षक तुषार मोहिते याने लैंगिक अत्याचार केला.

POCSO Case Filed Against Sports Teacher
फुटीनंतरही पश्‍चिम महाराष्ट्रात काँग्रेसचा बालेकिल्ला भक्कम; मोदींची लाट असतानाही जिंकल्या 'इतक्या' जागा

तसेच याच शाळेमधील ११ वीमध्ये शिकत असणाऱ्या अल्पवयीन मुलीवर डिसेंबर २०२३ मध्येच (नक्की तारीख नमूद नाही) वडूज (ता. खटाव) येथील जिल्हास्तरीय खेळाच्या स्पर्धा संपल्यानंतर त्‍याने त्याच्या चारचाकीमधून इतर विद्यार्थिनींना त्यांच्या घरी सोडल्यानंतर रस्त्यामध्ये लैंगिक अत्याचार केला. ज्या ज्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली आहे, अशा मुली व पालकांनी कोणत्याही प्रकारची भीती न बाळगता ग्रामीण पोलिस ठाण्यात संपर्क साधण्याचे आवाहन फलटण ग्रामीण पोलिस निरीक्षक सुनील महाडिक यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com