पोलिसांकडून बंदोबस्त; कुटुंबीयांचाही सहभाग

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 10 डिसेंबर 2018

पुणे - रविवारी पहाटे साडेतीन ते सकाळी दहा वाजेपर्यंत पुणे व पिंपरी-चिंचवड पोलिसांनी ‘पुणे हाफ मॅरेथॉन’ स्पर्धेत चोख बंदोबस्त ठेवला. वाहतुकीचे योग्य नियोजन, स्पर्धकांना सहकार्य आणि अनुचित प्रकार टाळण्यासाठी पुरेपूर खबरदारी घेतली. एकीकडे बंदोबस्त असतानाच दुसरीकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांसह शेकडो कर्मचारी कुटुंबीयांसह स्पर्धेत सहभागी झाले होते. तसेच, स्पर्धा पूर्ण करण्याचा मानही पटकाविला.

पोलिस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाचे अपर पोलिस आयुक्त मकरंद रानडे, पुण्याचे अतिरिक्त पोलिस आयुक्त (पूर्व विभाग) सुनील फुलारी यांच्यासह वरिष्ठ अधिकारी या वेळी उपस्थित होते. पुणे व पिंपरी-चिंचवड पोलिसांनी पहाटे साडेतीनपासून बंदोबस्तावर लक्ष केंद्रित केले होते. तसेच, सुरक्षिततेसह वाहतूक सुरळीत ठेवण्यावरही भर दिला.

पुणे-बंगळूर महामार्गावर वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी विशेष लक्ष देण्यात आले. त्यानंतर स्पर्धेच्या मार्गावर बाणेर रस्ता, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, औंध रस्ता, पुन्हा बाणेर रस्ता या मॅरेथॉन मार्गावर वाहतूक नियमन केले. मुख्य रस्त्यावर पहिल्यांदाच ‘लेन क्‍लोजर’ प्रयोग राबवून वाहतुकीला मार्ग करून दिला. मुख्य रस्त्यावर स्पर्धकांची गर्दी असल्यामुळे आयटीआय रस्ता, बाणेर रस्त्यासह अंतर्गत रस्त्यांवर काही काळ वाहतूक थांबविण्यात आली होती.

बंदोबस्तासाठी ५०० पोलिस
वाहतूक शाखेच्या पोलिस उपायुक्त तेजस्वी सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली २५० हून अधिक अधिकारी, कर्मचाऱ्यांनी महत्त्वपूर्ण काम केले. चतुःशृंगी ठाण्याचे पोलिस निरीक्षक दयानंद ढोमे, पोलिस निरीक्षक (गुन्हे) वैशाली गलांडे यांच्यासह ५० कर्मचारी आणि पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयातील २०० पोलिस कर्मचारी, हिंजवडी ठाण्याचे पोलिस निरीक्षक यशवंत गवारी,  वाकड ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुनील पिंजण यांच्यासह वरिष्ठ अधिकारी व पोलिस कर्मचाऱ्यांनी स्पर्धा सुरळीत पार पाडली. याबरोबरच विशेष शाखेचे पोलिस उपायुक्त अशोक मोराळे, परिमंडळ एकचे पोलिस उपायुक्त सुहास बावचे, परिमंडळ चारचे पोलिस उपायुक्त प्रसाद अक्कानवरू, परिमंडळ पाचचे पोलिस उपायुक्‍त प्रकाश गायकवाड, पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या परिमंडळ दोनच्या उपायुक्त नम्रता पाटील, सहायक पोलिस आयुक्त श्रीधर जाधव व गणेश गावडे यांनाही स्पर्धेत सहभाग घेतला.  

Web Title: police family participated in pune half marathon 2018