Portugal vs Congo DR : महाराष्ट्रापेक्षा कमी लोकसंख्या, पण Fifa World Cup स्पर्धेत भरारी... पोर्तुगालविरुद्ध ऐतिहासिक गोल करणाऱ्या 'काँगो' देशाची हवा...

DR Congo score first ever FIFA World Cup goal: महाराष्ट्राची लोकसंख्या सुमारे १२ कोटींच्या घरात आहे, तर काँगो लोकशाही प्रजासत्ताकाची (DR Congo) लोकसंख्या त्यापेक्षा कमी असली तरी फुटबॉलच्या विश्वमंचावर त्यांनी मोठी झेप घेतली आहे. फिफा विश्वचषक २०२६ मध्ये पोर्तुगालसारख्या बलाढ्य संघाविरुद्ध काँगोने इतिहास रचला आणि जगाचे लक्ष वेधून घेतले.
DR Congo score first ever FIFA World Cup goal

DR Congo score first ever FIFA World Cup goal

esakal

Updated on

Portugal vs Congo DR Marathi Football Fifa News: पोर्तुगाल विरुद्ध काँगो डीआर यांच्यातल्या फिफा फुटबॉल वर्ल्ड कप स्पर्धेतील पहिला हाफ चुरशीचा राहिला.. सहाव्या मिनिटाला पोर्तुगालने घेतलेल्या आघाडीला काँगोकडून भरपाईवेळेच्या शेवटच्या सेकंदाला प्रत्युत्तर मिळाले. काँगोचे ५२ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर ध्येय साकार झाले आहे, कारण योआने विसाने उंच उडी मारून एक जोरदार हेडर गोलकीपर डिओगो कोस्टाच्या आवाक्याबाहेर मारला आणि सामना १-१ असा बरोबरीत आणला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com