Sri Lanka vs Australia : पुन्हा 'जयसूर्या' नावाचं वादळ; इतिहासाची पुनरावृत्ती

Prabath Jayasuriya Became 3rd Debutant Bowler Who Took 6 Wicket In First Inning
Prabath Jayasuriya Became 3rd Debutant Bowler Who Took 6 Wicket In First Inning esakal

Sri Lanka vs Australia, 2nd Test: ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका (Sri Lanka Vs Australia) यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात श्रीलंकेकडून पदार्पण करणारा फिरकीपटू प्रभात जयसूर्याने (Prabath Jayasuriya) पाच विकेट घेतल्या. गाले कसोटीत जयसूर्याने पहिल्याच सामन्यात 6 विकेट घेत एक खास रेकॉर्ड आपल्या नावावर केले. प्रभात जयसूर्या आता कसोटी क्रिकेटच्या इतिहासात आपल्या पदार्पणाच्या सामन्यात 5 विकेट घेणारा सहावा गोलंदाज ठरला.

Prabath Jayasuriya Became 3rd Debutant Bowler Who Took 6 Wicket In First Inning
ENG vs IND T20I : फॉर्मसाठी चाचपडणाऱ्या विराट कोहलीला शेवटी संधी

याचबरोबर प्रभात जयसूर्या श्रीलंकेकडून कारकिर्दिच्या पहिल्याच सामन्यात 6 विकेट घेणारा तिसरा खेळाडू ठरला. प्रभातच्या आधी ही कामगिरी श्रीलंकेच्या उपुल चंदना आणि प्रविण जयविक्रमा यांनी केली होती. चंदनाने 1999 मध्ये पाकिस्तानविरूद्ध पदार्पणाच्या कसोटी सामन्यात पहिल्या डावात 6 विकेट घेतल्या.

तर 2021 मध्ये बांगलादेशविरूद्ध प्रविण जयविक्रमाने पदार्पणाच्या सामन्यात 92 धावा देत 6 विकेट घेतल्या होत्या. आता प्रभात जयसूर्याने मायदेशात सुरू असलेल्या ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या कसोटी सामन्यात पदार्पण केले. या पदार्पणाच्या सामन्यात 118 धावा देत 6 विकेट घतल्या.

Prabath Jayasuriya Became 3rd Debutant Bowler Who Took 6 Wicket In First Inning
Virat Kohli : अश्विनला डच्चू मिळूतो तर विराटला का नाही, माजी कर्णधाराचा सवाल

कसोटी पदार्पणात सहा विकेट घेणारे श्रीलंकन गोलंदाज

उपल चंदना - 1999

प्रविण जयविक्रमा - 2021

प्रभात जयसूर्या - 2022

श्रीलंका विरूद्ध ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात पहिल्या डावात स्टीव्ह स्मिथ आणि मार्नस लॅबुशग्ने यांनी शतकी खेळी करत 364 धावा केल्या. स्मिथने दमदार 145 धावांची खेळी केली. तर मार्नसने 104 धावांची खेळी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com