मटणासाठी कायपण! कोहलीनं जीव टाकला होता धोक्यात! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Virat Kohli

मटणासाठी कायपण! कोहलीनं जीव टाकला होता धोक्यात!

भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) शाकाहरी आहे. फिटनेसवर भर देण्यासाठी त्याने मांसहार खाण्याचा त्याग केला. ही गोष्ट बऱ्याच लोकांना माहित असेल. एका मुलाखतीमध्ये खुद्द विराट कोहलीनेही यावर भाष्य केले होते. कोहलीचा सहकारी राहिलेल्या प्रदीप सांगवान याने विराट कोहलीबाबतचा एक खास किस्सा शेअर केलाय. आयपीएल स्टार आणि दिल्लीकडून प्रथम श्रेणी क्रिकेट खेळलेल्या प्रदीप सांगवान (Pradeep Sangwan) याने अंडर 19 संघातील काही खास किस्से शेअर केले आहेत. यात त्याने विराट कोहलीबाबतच्या एका खास आठवणीला उजाळा दिला.

हेही वाचा: Womens World Cup Points Table : पाकिस्तान तळाला; भारतीय महिला संघ कुठे?

प्रदीप सांगवान इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हणाला की, ज्यूनिअर क्रिकेटमध्ये सात-आठ वर्षे कोहलीसोबत होता. कोहली हा चांगलाच खवय्या आहे. त्याला स्ट्रीट फूड खूप आवडायचे. आम्ही 19 वर्षांखालील भारतीय संघासोबत दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर गेलो होतो. त्यावेळी त्याला कुणीतही एका ठिकाणी उत्तम मटन रोल मिळतो, असे सांगितले. पण याठिकाणी जाणं सुरक्षित नसल्याची कल्पनाही दिली.

हेही वाचा: VIDEO : अझरूद्दीन 22 वर्षांनी मैदानात; लेकासोबत तुफान फटकेबाजी

तो पुढे म्हणाला, आमच्या ड्रायव्हरने देखील त्याठिकाणी उत्तम खायला मिळते. पण नुकतीच त्या भागात मोठा वाद झाला आहे. तिथे काही ना काही सुरुच असते. दोन गटातील मारामारीत एकमेकांवर वार झाल्याची गोष्टही ड्रायव्हरने सांगितली. पण यावर विराटने आपला निर्णय काही बदलला नाही. काही होत नाही आपण तिकडे जावू, असा रिप्लाय त्याने दिला. आम्ही त्या ठिकाणी जाऊन मटण रोल खाल्लाही. दरम्यान काही लोकांनी आमचा पाठलागही केला. पण आम्ही सुरक्षित आमच्या ठिकाणावर पोहचलो, असा किस्सा सांगवान याने शेअर केलाय. एका अर्थाने विराटने जीव धोक्यात टाकूनच मटन रोल खाण्यात रस दाखवला होता.

हेही वाचा: टोली चौकी में विराट कोहली; सिराजनं शेअर केला खास किस्सा

Web Title: Pradeep Sangwan Recalls Virat Kohli Risked Life For Mutton Rolls

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top