Gautam Adani : प्रज्ञानंदला आता अदानींच बॅकिंग; फोटो शेअर करत गौतम अदानी म्हणाले...

Praggnanandhaa backing from the Adani Group
Praggnanandhaa backing from the Adani Groupesakal

Praggnanandhaa backing from the Adani Group : भारताचा 18 वर्षाचा स्टार बुद्धीबळपटू प्रज्ञानंदला भारतातील प्रसिद्ध उद्योग समुह अदानी ग्रुपचं मोठं बॅकिंग लाभलं आहे. प्रज्ञानंदला आता गौतम अदानी ग्रुप स्पॉन्सर करणार आहे.

अदानी ग्रुपचे चेअरमन गौतम अदानी यांनी प्रज्ञानंदची भेट घेतली. त्यानंतर बोलताना ते म्हणाले की, 'प्रज्ञानंदला सपोर्ट करतोय याचा आम्हाला अभिमान आहे. त्याने ज्या वेगाने आणि कार्यक्षमतेने क्रीडा जगतात प्रगती केली आहे ती वाखाण्याजोगी आहे. प्रज्ञानंद हा सर्व भारतीयांसमोरचं एक चांगल उदाहरण आहे.'

Praggnanandhaa backing from the Adani Group
WTC Points Table 2023-25 | सिंहासन हिसकावलं! ऑस्ट्रेलियाने दोन दिवसात भारताला दिले दोन तगडे धक्के

दरम्यान प्रज्ञानंदने या भेटीनंतर प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला की, 'जागतिक स्तरावर मी माझ्या देशाचे नाव उंचवण्यासाठी कायम उत्सुक असणार आहे. ज्या ज्यावेळी मी खेळतो त्यावेळी माझा उद्येश हा जिंकणे आणि देशाचा गौरव वाढवणे हात असतो. मी अदानी ग्रुपचा आभारी आहे की त्यांनी माझ्या क्षमतेवर विश्वास ठेवला.'

Praggnanandhaa backing from the Adani Group
रिंकू सिंहने टीम इंडियातील स्टार खेळाडूची कारकीर्द आणली धोक्यात; एकाच खेळीनं वातावरण टाईट

प्रज्ञानंदने वर्ल्ड नंबर 1 मॅग्नस कार्लसेनला गेल्या काही स्पर्धांमध्ये कडवं आव्हान निर्माण केलं आहे. त्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रज्ञानंदची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. प्रज्ञानंदने गेल्या वर्षी अझरबैजानमधील बाकू येथे झालेल्या चेस फेडरेशन वर्ल्डकपमध्ये मॅग्नसला आव्हान दिलं होतं. त्याला अंतिम फेरीत यश आलं नाही. मात्र त्याच्या कामगिरीचं जागतिक स्तरावर कौतुक झालं होतं.

प्रज्ञानंदने हांगझू येथे झालेल्या एशियन गेम्स स्पर्धेत पुरूष सांघिक प्रकारात रौप्य पदक पटकावलं होतं.

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com