

Praggnanandhaa wins Grand Chess Tour 2026 after defeating Fabiano Caruana
Sakal
Praggnanandhaa Grand Chess Tour : भारताचा स्टार खेळाडू ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंद याने अमेरिकेच्या ग्रँडमास्टर फॅबियानो कारुआना याचे आव्हान मोडीत काढत ग्रँड चेस टूर जिंकली. यासह त्याने इतिहास घडवला आहे. प्रज्ञानंद याने फॅबियानोला १५-१३ अशा फरकाने पराभवाचा धक्का दिला.
यासह त्याने पहिल्यांदाच ग्रँड चेस टूरचे विजेतेपद मिळवले असून तो हे विजेतेपद मिळवणारा पहिलाच भारतीय बुद्धिबळपटू ठरला. त्यामुळे पुन्हा एकदा त्याची जागतिक बुद्धिबळातील ताकद अधोरेखित झाली असून जागतिक स्थरावर भारतीय खेळाडूंचा बुद्धिबळातील वाढता दबावही स्पष्ट झाला आहे.