From Ambedkar Stadium to Chepauk
esakal
मंगळवारी पार पडलेल्या लिलावात अष्टपैलू प्रशांत वीरवर सीएसकेने १४.२० कोटी रुपयांची बोली लावली. त्याची बेस प्राईज ३० लाख इतकी होती. त्याच्यासाठी आधी लखनौ सुपर जायंट्स आणि मुंबई इंडियन्सने प्रयत्न केले. पण नंतर चेन्नई सुपर किंग्स आणि सनरायझर्स हैदराबाद संघात चुरस रंगली. अखेर चेन्नई सुपर किंग्सने तब्बल १४.२० कोटी रुपयांत त्याला आपल्या ताफ्यात समाविष्ट करून घेतलं. तो सर्वात महागडा अनकॅप्ड खेळाडू ठरला.