IPL 2020 : वयाच्या ४८व्या वर्षी लिलाव; यंदा 'या' खेळाडूचे आहे सर्वाधिक वय 

pravin tambe became oldest player sold in ipl auction 2020
pravin tambe became oldest player sold in ipl auction 2020

मुंबई : वयाच्या ४८व्या वर्षी प्रवीण तांबे या क्रिकेटपटूला कोलकाता नाईट रायडर्स या आईपीएल संघाने खरेदी केले आहे. आईपीएल13 च्या सीजनमध्ये खेळणारा तांबे हा सर्वाधिक वयाचा खेळाडू ठरणार आहे. आईपीएल२०२० मध्ये खेळण्यासाठी केकेआर संघाने तांबेला २० लाख रुपये मोजत खरेदी केले आहे. तांबेची २० लाख रुपये मूळ किंमत होती. त्याच किमतीला केकेआरकडून त्याला खरेदी करण्यात आले आहे.

८ ऑक्टोबर १९७१ रोजी जन्म झालेल्या प्रविण तांबेने २०१३मध्ये वयाच्या ४१व्या वर्षी आयपीएलमध्ये खेळण्यास सुरुवात केली होती. सुरुवातीला राहुल द्रविडने राजस्थान रॉयल्स संघात तांबेचा समावेश केला. त्यानंतर तांबेने पहिला सामना दिल्लीविरुद्ध राजस्थान संघाकडून जयपूरमध्ये खेळला. त्यानंतर त्याने सातत्याने आईपीएलच्या कोणत्या न कोणत्या संघाचे प्रतीनिधीत्व केले आहे. 

IPL 2020 : विराट आता सनरायजर्सच्या ताफ्यात; मोजले दहापट जास्त पैसे 

राजस्थानशिवाय तांबेने सनरायजर्स हैद्राबाद संघाचे प्रतिनिधीत्व केले आहे. २०१७मध्ये हैद्राबाद संघाने १०लाख रुपयाची बोली लावत तांबेला आपल्या संघात सामील केले होते. आईपीएलच्या आतापर्यंत चार सीजनमध्ये 2013, 2014, 2015, 2016 च्या दरम्यान, तांबेने 33 मॅच खेळताना 30.46च्या सरासरीने धावा बनवल्या असून गोलंदाजी करताना 7.75च्या इकोनॉमीने 28 बळी घेतले आहेत. त्याचे सर्वोत्तम प्रदर्शन हे 20 धावा देत ४ बळी हे आहे. हे प्रदर्शन त्याने२०१४मध्ये अहमदाबाद मध्ये केकेआरविरुद्ध खेळलेल्या सामन्यात केलेले आहे. याच सामन्यात त्याने हॅट्रिकही करण्याची किमयाही साधली होती. या सामन्यासाठी त्याला सामनावीर घोषित करण्यात आले होते. तांबेला आईपीएल खेळल्यानंतर मुंबईसाठी खेळण्याची संधी मिळाली होती. २०१३-१४मध्ये त्याला ही ओडिसाविरुद्ध खेळण्याची संधी मिळाली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com