esakal | IPL 2020 : विराट आता हैदराबादच्या ताफ्यात; सनरायझर्सने मोजले 10 पट जास्त पैसे
sakal

बोलून बातमी शोधा

Sunrisers_Hyderabad

सर्वात जास्त धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत विराट आठव्या स्थानावर होता. यादरम्यान त्याने 3 अर्धशतके लगावली होती. तर नाबाद 76 धावांची खेळी या स्पर्धेतील त्याची सर्वोत्तम खेळी होती. 

IPL 2020 : विराट आता हैदराबादच्या ताफ्यात; सनरायझर्सने मोजले 10 पट जास्त पैसे

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

कोलकाता : आयपीएल 2020 च्या आगामी मोसमासाठी गुरुवारी (ता.19) खेळाडूंचा लिलाव सुरू होता. यामध्ये अनेक तरूण आणि सध्या चर्चेत असलेल्या खेळाडूंना आपल्या गोटात सामील करण्यासाठी सगळ्या टीम्सचे मालक लिलाव प्रक्रियेत सहभागी झाले होते. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

यादरम्यान सनरायझर्स हैदराबादने अनेक नव्या खेळाडूंना आपल्या ताफ्यात सामील केले. तरुण खेळाडूंचा भरणा असलेल्या या टीममध्ये अनेक भारतीय खेळाडूंना स्थान देण्यात आले आहे. यावेळी हैदराबादने नव्या दमाचा खेळाडू विराट सिंगसाठी तब्बल 1.9 कोटी रुपयांची बोली लावली. विराटला बेस प्राईसपेक्षा तब्बल दहा पट जास्त किंमत मिळाली आहे. 

- IPL 2020 : बेस प्राईज फक्त दोन कोटी अन् कमावले 15.50 कोटी, कोण पाहा

विराट 22 वर्षांचा डावखुरा फलंदाज असून कधीकधी गोलंदाजीही करतो. नुकत्याच झालेल्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये त्याने आपल्या खेळीने सर्वांचे लक्ष्य वेधून घेतले होते. त्याने 10 सामन्यात 57.16च्या सरासरी आणि 142.32 च्या स्ट्राईक रेटने 343 धावा केल्या होत्या.

- IPL 2020 : जगातला भारी खेळाडू अन् राहिला UNSOLD!

सर्वात जास्त धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत विराट आठव्या स्थानावर होता. यादरम्यान त्याने 3 अर्धशतके लगावली होती. तर नाबाद 76 धावांची खेळी या स्पर्धेतील त्याची सर्वोत्तम खेळी होती. 

- IPL 2020 : पंजाबचा बॅटींग कोच झाला आता नवा कर्णधार पाहा!

विराटचे असे आहे टी-20 करिअर

2014 मध्ये व्यावसायिक क्रिकेट खेळण्यास सुरवात केली. त्यानंतर त्याने एकूण 56 सामने खेळले असून त्यामध्ये 35.27 ची सरासरी आणि 124.45 चा स्ट्राईक रेट राखला आहे. यामध्ये 10 अर्धशतकांचा समावेश असून 12 वेळा तो नाबाद राहिला आहे. 

एकूण सामने - 56 
धावा - 1552
सर्वोच्च धावसंख्या - 81 
अर्धशतके - 10 
सरासरी - 35.27
स्ट्राईक रेट - 124.45