
Prithvi Shaw Jay Shah : पृथ्वी शॉ जय शहांच्या ट्विटला उत्तर देत म्हणतो; तुमचे शब्द माझ्यासाठी...
Prithvi Shaw Reply to Jay Shah : भारताचा सलामीवीर पृथ्वी शॉला जरी भारतीय संघात स्थान मिळत नसले तरी रणजी ट्रॉफी आणि देशांतर्गत सामन्यांमध्ये तो शतकांचा पाऊस पाडत आहे. रणजी ट्रॉफीच्या आसामविरूद्धच्या सामन्यात त्याने पहिल्या डावात 383 चेंडूत 379 धावांची आक्रमक आणि विक्रमी खेळी केली. यानंतर त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. बीसीसीआय सचिव जय शहा यांनी देखील ट्विट करून पृथ्वी शॉचे अभिनंदन केले. यावर पृथ्वी शॉने ट्विट करतच प्रतिक्रिया दिली.
हेही वाचा: Prithvi Shaw : पृथ्वी शॉने केलं मोठं विधान; म्हणाला, मी असा व्यक्ती आहे जो...
पृथ्वी शॉच्या विक्रमी 379 धावांच्या खेळी नंतर जय शहा यांनी ट्विट केले की, 'अजून एकाची विक्रमांच्या यादीत नोंद झाली. जबरदस्त खेळी पृथ्वी शॉ! रणजी ट्रॉफी इतिहासातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च खेळी केल्याबद्दल आभिनंदन. जबरदस्त क्षमता असलेली गुणवत्ता. तुझा अभिमान आहे.'
या ट्विटला पृथ्वी शॉने देखील उत्तर दिले. तो आपल्या ट्विटमध्ये म्हणतो की, 'खूप खूप आभारी आहे जय शहा सर. तुमचे प्रोत्साहन देणारे शब्द माझ्यासाठी खूप महत्वाचे आहेत. मी यापुढेही कष्ट करत राहणार.'
रणजी ट्रॉफीत 379 धावांची धडाकेबाज खेळी केल्यानंतर पृथ्वी शॉला भारतीय संघात निवड होण्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. मात्र त्यावेळी त्याने अत्यंत परिपक्वपणे उत्तर दिले. पृथ्वी शॉ पीटीआयशी बोलताना म्हणाला की, 'आता मी कोणी तरी मला कॉल करून तुला भारतीय संघात स्थान दिल्याचे सांगले याबाबत विचार करत नाही. मी सध्या माझ्या परीने चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करतोय आणि करतही आहे. सध्या मी फार पुढचा विचार करत नाहीये.'
पृथ्वी शॉ पुढे म्हणाला की, 'मी असा व्यक्ती आहे जो आता एकावेळी एकच दिवस जगतोय. मी माझा दिवस कसा चांगला जाईल हे पाहतोय. मी मुंबईकडून खेळतोय त्यामुळे माझे सध्या ध्येय एकच आहे. मुंबईला रणजी ट्रॉफी जिंकून देणे.'
हेही वाचा : गुंतवणूक करताना ‘हम होंगे कामयाब, पूरा है विश्वास!’...पण कसे? घ्या जाणून