
Prithvi Shaw: पृथ्वी शॉने केलं मोठं विधान; म्हणाला, मी असा व्यक्ती आहे जो...
Prithvi Shaw Ranji Trophy : धडाकेबाज सलामीवीर पृथ्वी शॉने रणजी ट्रॉफीमध्ये आसामविरूद्धच्या सामन्यात 383 चेंडूत 379 धावांची खेळी केली. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सर्वोच्च धावसंख्या करणाऱ्यांच्या यादीत पृथ्वी शॉची ही 379 धावांची खेळी दुसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च खेळी म्हणून गणली जाणार आहे. तर मुंबईकडून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सर्वोच्च खेळी करणाऱ्यांमध्ये पृथ्वी शॉ आता सर्वोच्च स्थानावर आहे.
पृथ्वी शॉ सातत्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करत शतकांचा रतीब घातला आहे. मात्र तरी देखील भारतीय संघाचे दरवाजे त्याच्यासाठी उघडलेले नाहीत. मध्यंतरी संघनिवड झाली की पृथ्वी शॉ सोशल मीडियावर क्रिप्टिक स्टोरी ठेवून आपल्या भावना व्यक्त करत होता.
हेही वाचा: PAK vs NZ: असं काय घडलं की पाकिस्तानच्या खेळाडूनं थेट उंपायरचे पायच पकडले
रणजी ट्रॉफीत 379 धावांची धडाकेबाज खेळी केल्यानंतर पृथ्वी शॉला भारतीय संघात निवड होण्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. मात्र त्यावेळी त्याने अत्यंत परिपक्वपणे उत्तर दिले.
पृथ्वी शॉ पीटीआयशी बोलताना म्हणाला की, 'आता मी कोणी तरी मला कॉल करून तुला भारतीय संघात स्थान दिल्याचे सांगले याबाबत विचार करत नाही. मी सध्या माझ्या परीने चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करतोय आणि करतही आहे. सध्या मी फार पुढचा विचार करत नाहीये.'
पृथ्वी शॉ पुढे म्हणाला की, 'मी असा व्यक्ती आहे जो आता एकावेळी एकच दिवस जगतोय. मी माझा दिवस कसा चांगला जाईल हे पाहतोय. मी मुंबईकडून खेळतोय त्यामुळे माझे सध्या ध्येय एकच आहे. मुंबईला रणजी ट्रॉफी जिंकून देणे.'
हेही वाचा: क्रिकेटर कोहली धोनीच्या मुली ट्रोल; दिल्ली पोलिसांना कारवाईचे आदेश
मुंबई विरूद्ध आसाम रणजी ट्रॉफी सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या मुबंईने पहिला डाव 4 बाद 687 धावांवर घोषित केला.
पृथ्वी शॉच्या 379 धावांबरोबरच कर्णधार अजिंक्य रहाणेने देखील 191 धावांची मोठी खेळी केली. त्याने 302 चेंडूत 15 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 191 धावा केल्या. मात्र त्याचे द्विशतक अवघ्या 9 धावांनी हुकले.
हेही वाचा : गुंतवणूक करताना ‘हम होंगे कामयाब, पूरा है विश्वास!’...पण कसे? घ्या जाणून