Prithvi Shaw : पृथ्वीचं वादळ! तिसऱ्यांदा ठोकले त्रिशतक, करियरचा बेस्ट स्कोअर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ranji Trophy 2023 Prithvi Shaw

Prithvi Shaw : पृथ्वीचं वादळ! तिसऱ्यांदा ठोकले त्रिशतक, करियरचा बेस्ट स्कोअर

Ranji Trophy 2023 Prithvi Shaw : मुंबईचा सलामीवीर पृथ्वी शॉ याने रणजी करंडकातील कारकिर्दीतील पहिले त्रिशतक झळकावले आहे. आसामविरुद्ध खेळल्या जात असलेल्या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी त्याने हा पराक्रम केला आहे. त्याने त्रिशतक झळकावून आपल्या प्रथम श्रेणी क्रिकेट कारकिर्दीतील सर्वात मोठी धावसंख्या बनवली. त्रिशतक गाठण्यासाठी पृथ्वीने ३२६ चेंडूंचा सामना केला.

हेही वाचा: Rahul Dravid Birthday: 'या रिपोर्टरला बाहेर काढा...', जेव्हा राहुल द्रविड पाकिस्तानमध्ये संतापला

रणजी ट्रॉफीमध्ये मुंबई आणि आसाम यांच्यात खेळल्या जात असलेल्या सामन्याचा आज दुसरा दिवस आहे. पृथ्वी शॉ पहिल्या दिवसाच्या 240 धावांच्या पुढे खेळायला आला. पण दुसऱ्या दिवशी त्याने पुढच्या 60 धावा इतक्या वेगाने केल्या की 300 धावा केव्हा पूर्ण झाल्या हे कळलेच नाही.

हेही वाचा: IND vs SL: विराट कोहली संतापला! ...अन् पांड्यावर वटारले डोळे!

आसामविरुद्ध त्रिशतक ठोकून पृथ्वी शॉने रणजी ट्रॉफीमध्ये गेल्या 6 वर्षात जे घडले तेच केले आहे. या दीर्घ स्वरूपाच्या स्थानिक स्पर्धेत शतक झळकावणारा तो 2017 नंतरचा पहिला फलंदाज ठरला आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे पृथ्वी शॉची खेळी जसजशी प्रगती करत आहे तसतसा त्याचा स्ट्राईक रेटही वाढत आहे.

पृथ्वी शॉचा खेळ अजूनही सुरूच आहे. ही बातमी आसामसाठी चांगली नसली तरी क्रिकेट चाहत्यांना चकित करणारी आहे. आता पृथ्वी जितके जास्त खेळेल तितके विक्रम मोडले जाईल. तो ज्या पद्धतीने खेळत आहे, जर तो आज संपूर्ण दिवस खेळला तर ब्रायन लाराचा 501 धावांचा विक्रमही सुरक्षित नाही.

टॅग्स :Prithvi Shaw