IND vs SL: विराट कोहली संतापला! ...अन् पांड्यावर वटारले डोळे!

विराट कोहली आपला सहकारी खेळाडू हार्दिक पांड्यावर अशा प्रकारे संतापला की...
Virat Kohli got angry hardik pandya
Virat Kohli got angry hardik pandyasakal

Virat Kohli and Hardik Pandya : भारत आणि श्रीलंका यांच्यातील वनडे मालिकेतील पहिला सामना टीम इंडियाने 67 धावांनी जिंकला. या सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताने प्रथम फलंदाजी करताना 373 धावा केल्या. प्रत्युत्तरात श्रीलंकेचा संघ आठ गडी गमावून केवळ 306 धावा करू शकला आणि 67 धावांनी सामना गमावला. या विजयासह भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

Virat Kohli got angry hardik pandya
Virat Kohli : मी कायम खेळत राहणार नाही... पाठोपाठच्या दोन शतकानंतरची 'विराट' प्रतिक्रिया व्हायरल

पहिल्या सामन्यात टीम इंडियाच्या फलंदाजीदरम्यान खेळपट्टीवर काहीतरी घडले, ज्याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 43व्या षटकात हे दृश्य पाहायला मिळाले. येथे विराट कोहली आपला सहकारी खेळाडू हार्दिक पांड्यावर अशा प्रकारे रागावला की तो त्याच्याकडे रागाने पाहू लागला.

Virat Kohli got angry hardik pandya
Ruturaj Gaikwad : ऋतुराजचा तांडव ठोकले वादळी शतक

भारतीय डावाच्या 43व्या षटकात कसून राजिताच्या एका चेंडूवर, विराट कोहलीने ऑन-साईडला हलक्या हातांनी शॉट खेळला. यानंतर त्याने एक धाव झटपट पूर्ण केली. दुसरी धाव घेण्यासाठी तो अर्ध्या खेळपट्टीवर आला पण इथे हार्दिक पांड्याने धाव घेण्यास नकार दिला. कोहली पुन्हा क्रीझवर परतला पण त्यानंतर तो हार्दिककडे रागाने पाहू लागला.

Virat Kohli got angry hardik pandya
Ind vs Aus Test Series: कांगारू दुखापतीने त्रस्त! भारत दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलियन कसोटी संघ जाहीर

विराट कोहली खेळपट्टीवर वेगाने धावा काढण्यासाठी ओळखला जातो. इथेही दोन धावा सहज पूर्ण करता याव्यात म्हणून तो हलक्या हातांनी खेळला, पण तसे न झाल्याने तो संतापलेला दिसत होता. या सामन्यात विराट कोहलीने अप्रतिम शतक झळकावले. त्याने 87 चेंडूत 113 धावांची खेळी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com