esakal | जबऱ्या कॅचनंतर प्रियांका गांधीही झाल्या हरलीनच्या फॅन
sakal

बोलून बातमी शोधा

Priyanka Gandhi On Harleen Deols

जबऱ्या कॅचनंतर प्रियांका गांधीही झाल्या हरलीनच्या फॅन

sakal_logo
By
सुशांत जाधव

भारतीय महिला संघाला इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यात हरलीन देओल (Harleen Deol) हिने कमालीचा कॅच घेत भारतीय महिला संघाच्या क्षेत्ररक्षणाचा दर्जा उंचावल्याचे संकेत सर्वांना दिले. तिच्या या झेलची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांनी देखील तिचे कौतुक केले आहे. (Priyanka Gandhi Reacts Harleen Deols Sensational Catch)

प्रियांका गांधी यांनी महिला सर्वोत्तम असतात, या खास कॅप्शनसह हरलीनचा चर्चेत असलेला व्हिडिओ सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केलाय. प्रियांका गांधी यांनी शेअर केलेल्या व्हिडिओवर अनेक प्रतिक्रिया उमटत असून नेटकरी याला पंसती देताना दिसते.

हेही वाचा: VIDEO : हमारी छोरियां छोरो से कम है के; हरलीनचा कॅच बघाच!

पहिल्या टी-20 सामन्यात भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर हिने टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. शिखा पांड्येच्या 19 व्या षटकातील पाचव्या चेंडूवर हरलीनने तडाखेबाज फटकेबाजी करत असलेल्या अ‍ॅमी एलेन जोन्सन हिचा अप्रतिम कॅच पकडला. सीमारेषेवर तिने ज्या पद्धतीने हा झेल घेतला तो डोळ्याचे पारणे फेडणारा होता. तिने दाखवलेला कमालीचा ताळमेळ आणि अचूक अंदाज याची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. अनेक दिग्गज क्रिकेटरही तिच्या या फिल्डिंगचे कौतुक करत आहेत.

हेही वाचा: ENG W vs IND W, 1st T20I : दोघींनी केली धावांची बरसात!

भारताचे माजी कसोटीपटू लक्ष्मण, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिन जय शहा यांनी देखील हरलीन देओलच्या फिल्डिंगला दाद दिल्याचे पाहायला मिळाले. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी हरलीनचे कौतुक केले आहे. हरलीनने घेतलेला कॅच हा क्रिकेटच्या मैदानातील आतापर्यंत पाहिलेला सर्वोत्तम कॅचपैकी एक असल्याचे लक्ष्मण यांनी म्हटले आहे. हरलीन देओल हिने मैदानात हजर जबाबीपणा दाखवून घेतलेला कॅच भारतीय क्रिकेटमधील सर्वोत्तम क्षण होता, असा उल्लेख जय शहा यांनी ट्विटरच्या माध्यमातून केला आहे.

loading image