Pro Hockey League : भारतीय संघाने वर्ल्ड चॅम्पियन जर्मनीला दिला पराभवाचा धक्का

Hockey Team India : भारतीय संघाने विश्वविजेत्या जर्मनीला आपली गोलपोस्ट एकदाही भेदण्याची संधी दिली नाही.
Team India Hockey
Pro Hockey League esakal

Pro Hockey League : हरमनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने प्रो हॉकी लीगच्या लंडन टप्प्यात विश्वविजेत्या जर्मनीचा धक्कादायक पराभव केला.

स्वतः ड्रॅग फ्लिकर असलेल्या हरमनप्रीतने १६व्या, सुखजीत सिंगने ४१व्या तर गुरजंत सिंगने ४४व्या मिनिटाला गोल केले. जर्मनीने या सामन्यात प्रामुख्याने नवोदितांना संधी दिली; पण त्यांनीही जोरदार आक्रमणाने सुरुवात केली होती; मात्र भारतीयांच्या नियोजित खेळासमोर त्यांची मात्र चालली नाही.

Team India Hockey
Rishabh Pant : विराटची जागा घेणाऱ्या ऋषभ पंतचा युएसएमध्ये धमाका; टी 20 वर्ल्डकपची केली दमदार सुरूवात

जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानावर असलेल्या भारताचे या प्रो हॉकीत १३ सामन्यांतून २४ गुण झाले असून ते तिसऱ्या स्थानावर आहेत. अँटवर्प टप्प्यात भारताचा दोनदा पराभव करणारे अर्जेंटिना १४ सामन्यांत २६ गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहेत. तर १२ सामन्यांतून २६ गुणांची कमाई करणारे नेदरलँड्स पहिल्या क्रमांकावर आहेत.

जर्मनीच्या संघाने पहिल्या सत्रात बेधडक खेळ केला; परंतु त्यांची आक्रमणे भारताचा अनुभवी गोलरक्षक श्रीजेशनने यशस्वीपणे थोपविली. भारतालाही पहिल्या दोन पेनल्टी कॉर्नरवर गोल करता आले नाहीत; परंतु दुसऱ्या सत्राच्या पहिल्याच मिनिटाला हरमनप्रीतने पेनल्टी कॉर्नरवर गोल केला.

Team India Hockey
IND vs BAN : रोहित शर्मानं सलामी जोडीदार बदलला; यशस्वी ऐवजी दिली या खेळाडूला संधी मात्र...

त्यानंतर सुखजीतने ४१व्या मिनिटाला भारताची आघाडी दुप्पट केली. अभिषेकच्या पासवर त्याने जर्मन गोलरक्षकाला पुरते चकविले. तीन मिनिटांनंतर गुरजंतने भारताचा तिसरा गोल केला.

०-३ अशा पिछाडीनंतर जर्मनीच्या खेळाडूंनी आपले आक्रमण अधिक धारदार केले, भारतीय गोलक्षेत्रात त्यांनी प्रवेशही केला; परंतु त्यांना पुन्हा एकदा श्रीजेशची भिंत भेदता आली नाही. भारताचा जर्मनीविरुद्धचा पुढचा सामना ८ जून रोजी होणार आहे, तर ग्रेट ब्रिटनविरुद्धच्या लढती २ आणि ९ जून रोजी आहेत.

(Hockey Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com