
Pro Kabaddi 11: यू मुंबा संघाने मंगळवारी बंगाल वॉरियर्स संघावर विजय मिळवताना प्रो कबड्डी स्पर्धेच्या यंदाच्या मोसमात प्ले ऑफमध्ये पोहोचण्याचा मान संपादन केला. यू मुंबाने बंगाल वॉरियर्सचा ३६-२७ असा पराभव केला. या विजयासह यू मुंबाने गुणतालिकेत पाचव्या स्थानावर झेप घेतली.