
प्रो कबड्डी लीग स्पर्धेतील १२ व्या हंगामात बुधवारी (३ सप्टेंबर) झालेल्या सामन्यात स्पर्धेतील तिसऱ्या टाय ब्रेकरचा थरार पाहायला मिळाला. यु मुंबा आणि हरियाना स्टीलर्स या दोन्ही संघांमध्ये अटीतटीची लढत रंगली. सामना ३६-३६ ने बरोबरीत सुटल्यानंतर टाय ब्रेकरमध्ये हरियाना स्टीलर्सने ७-६ ने बाजी मारली.
यु मुंबाकडून पहिली चढाई करताना अजित चौहानने नेहमीप्रमाणे बोनसचा प्रयत्न केला, यादरम्यान त्याने १ गुण घेत दमदार सुरूवात करून दिली. हरियाना स्टीलर्सकडून नवीनने १ गुण घेत संघाचं खातं उघडून दिलं.