Pro Kabaddi 2019 : मुंबईच्या बचावातील चुका हरियाणाच्या पथ्यावर!

HaryanaVsMumbai
HaryanaVsMumbai

प्रो-कबड्डी : चेन्नई : स्टार आक्रमक विकास कंडोलासमोर यू मुम्बाचा बचावही कोलमडला. त्यामुळे हरियाना स्टीलर्सने सोमवारी प्रो-कबड्डीतील लढतीत 27-30 असा विजय मिळवला. मुंबईच्या बचावातील चुकाही हरियानाच्या पथ्यावर पडल्या. 
या लढतीपूर्वी मुंबई; तसेच हरियानाने प्रत्येकी आठ सामन्यांत चार विजय मिळवला होता. मुंबई आक्रमणात कमी आहेत, हे लक्षात घेऊन हरियानाने आक्रमक सुरवात केली. बोनस गुण घेण्याच्या नादात मुंबई आक्रमकांकडून चुका झाल्या. विकास कंडोलाने एकाच चढाईत तिघांना बाद केल्यामुळे मुंबईवर लोण चढला. 

विश्रांतीस मुंबई 8-16 मागे होते; पण त्यांनी अभिषेक सिंगला मैदानात उतरवले. अभिषेकच्या प्रभावी चढायांना भक्कम बचावाची साथ लाभली. त्यामुळे मुंबईची पिछाडी दहा मिनिटांत दोन गुणांची झाली; पण त्याचवेळी रवी कुमार आणि चांद सिंगने मुंबई बचावाला चुका करण्यास भाग पाडले. पुन्हा मुंबईची पिछाडी 17-25 झाली. 

संदीप नरवालच्या चढायांनी मुंबईला जीवदान दिले. तीन मिनिटे असताना मुंबईची पिछाडी एका गुणाची झाली; पण अखेर विजय त्यांच्यापासून दुरावलाच.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com