
येत्या २९ तारखेपासून सुरू होणाऱ्या प्रो कबड्डीच्या बाराव्या हंगामात प्रो कबड्डीच्या प्रशासनाने नियमांत काही बदल केले आहेत. यातील साखळी सामन्यांतही टायब्रेकरचा अवलंब हा सर्वात महत्त्वाचा बदल समजला जात आहे. त्यामुळे साखळीतील लढतीत आता ‘टाय’ सामने होणार नाहीत. प्रो कबड्डीत आणि एकूणच कबड्डी स्पर्धांतील साखळीतील लढतीत टाय (बरोबरीत) होणाऱ्या काही सामन्यांकडे संशयाने पाहिले जात असते.