Dabang Delhi K.C. vs Puneri Paltan Fina
esakal
Dabang Delhi K.C. vs Puneri Paltan, Pro Kabaddi League Final 2025: PKL 2025 मध्ये दमदार कामगिरी करून अंतिम फेरीत पोहोचणाऱ्या पुणेरी पलटन व दबंग दिल्ली के. सी. यांच्यातला अंतिम सामना अटीतटीचा झाला. पण, दबंग दिल्लीच्या चढाईपटूंचे वर्चस्व पाहायला मिळाले आणि त्याचवेळी पुण्याच्या चढाईपटूंनी निराश केले. पुण्याने शेवटपर्यंत कडवी टक्क दिली, परंतु दिल्लीने घरच्या मैदानावर ३०-२८ असा विजय मिळवून दुसरे पीकेएल टायटल नावावर केले. दिल्लीकडून नीरज नरवाल ( ९), अजिंक्य पवार ( ६), अनुराग ( २), सौरभ नांडल ( २) व सुजरीत सिंग ( २) यांनी चांगले योगदान दिले. पुण्याच्या आदित्य शिंदेने ( १०) झुंज दिली. त्याला अभिनेष ( ४), पंकज मोहिते ( ४), गौरव खत्री ( ३) व गुरदीप ( २) यांची साथ मिळाली.