प्रो-कबड्डीची फायनल मुंबईत सुरवात चेन्नईपासून 

Pro-Kabaddi final Mumbai starts from Chennai
Pro-Kabaddi final Mumbai starts from Chennai

मुंबई : प्रो-कबड्डीच्या यंदाच्या मोसमाचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. 5 ऑक्‍टोबरपासून चेन्नईत सुरुवात होईल आणि 5 जानेवारीला मुंबईत सांगता होईल. गतवर्षीची सामन्यांची रचना यंदाही कायम ठेवण्यात आली आहे. यंदा बंगळूर आणि पटणा या ठिकाणांचे पुनरागमन झाले आहे. गतवेळेस बंगळूरचे सामने नागपूर; तर पाटणा येथील सामने रांचीत झाले होते. चेन्नईविरुद्ध हैदराबाद असा सलामीचा सामना होईल. त्याच दिवशी यू मुम्बा आणि हैदराबाद दुसऱ्या सामन्यात एकमेकांशी लढतील. 

चेन्नईत सुरवात झाल्यानंतर पुढचा टप्पा सोनिपत येथे होईल. त्यानंतर पुण्यात दसऱ्यानंतर 19 ते 25 ऑक्‍टोबरदरम्यान तिसरा टप्पा होईल. मुंबईतील टप्पा 9 ते 15 नोव्हेंबरला होणार आहे. यंदाही साखळीतील प्रत्येक टप्पा सात दिवसांचा असेल (शुक्रवार ते गुरुवार) आणि पहिल्या तीन दिवसांनंतर (सोमवार) विश्रांतीचा दिवस असेल. कोचीचा संघ नसला तरी बाद फेरीचे सामने कोचीला देण्यात आले आहेत. 30 आणि 31 डिसेंबर रोजी हे सामने होतील. 3 आणि 5 जानेवारी रोजी अनुक्रमे उपांत्य आणि अंतिम सामना मुंबईत होणार आहे. 
स्पर्धेचा कार्यक्रम : 
चेन्नई : (5 ते 11 ऑक्‍टोबर), सोनिपत : (12 ते 18 ऑक्‍टोबर), पुणे : (19 ते 25 ऑक्‍टोबर), पाटणा : (26 ऑक्‍टोबर ते 1 नोव्हेंबर), लखनौ : (2 ते 8 नोव्हेंबर), मुंबई : (9 ते 15 नोव्हेंबर), अहमदाबाद : (16 ते 22 नोव्हेंबर), बंगळूर : ( 23 ते 29 नोव्हेंबर), दिल्ली : (30 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर), हैदराबाद : (7 ते 13 डिसेंबर), जयपूर : (14 ते 20 डिसेंबर), कोलकता : (21 ते 27 डिसेंबर), कोची (बाद फेरी : 30 आणि 31 डिसेंबर). मुंबई : (उपांत्य आणि अंतिम सामना. 3 आणि 5 जानेवारी) 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com