PKL Season 12 kickoff on National Sports Day : प्रो कबड्डी लीग स्पर्धेतील १२ व्या हंगामाला २९ ऑगस्टपासून सुरूवात होणार आहे. या हंगामाची सुरूवात विशाखापट्टणम येथून होणार आहे. या स्पर्धेचा शुभारंभ भारताच्या राष्ट्रीय क्रीडा दिनी होणार आहे. सात वर्षांनंतर प्रो कबड्डी लीग स्पर्धा या शहरात परतली आहे. या हंगामाची सुरूवात तेलुगू टायटन्स आणि तमिळ थलायवाज यांच्यात होणाऱ्या सामन्याने होणार आहे. हा सामना तेलुगू टायटन्सच्या घरच्या मैदानावर होणार आहे. पहिल्या दिवसातील दुसऱ्या लढतीत बेंगळुरू बुल्सचा सामना पुणेरी पलटन संघाविरूद्ध होणार आहे.