PSL Controversy: इंडियन प्रिमिअर लीगप्रमाणेच पाकिस्तानमध्ये 'पाकिस्तान सुपर लीग' स्पर्धा सुरू आहे. मात्र, पाकिस्तानने या स्पर्धेतही त्यांच्या गरिबीचं प्रदर्शन केलं आहे. या स्पर्धेत शतक झळकावणाऱ्या एका खेळाडूला सामनावीर पुरस्कार म्हणून चक्क हेअर ड्रायर देण्यात आलं आहे. त्याचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. या प्रकारानंतर पाकिस्तान क्रिकेटची लाज चव्हाट्यावर आली आहे.