Puja Tomar: भारताच्या पुजाने रचला इतिहास! UFC मध्ये विजय मिळवणारी बनली पहिली भारतीय फायटर

Puja Tomar UFC: भारताच्या पुजा तोमरने युएफसीमध्ये पदार्पणाचा सामना जिंकून इतिहास रचला आहे.
Puja Tomar
Puja TomarSakal

Puja Tomar UFC: भारतीय खेळाडू सध्या विविध खेळात चमकताना दिसत आहेत. नुकतेच भारताच्या पुजा तोमर हिने इतिहास रचला आहे. तिने अल्टिमेट फायटिंग चॅम्पियनशीपमध्ये (UFC) विजय मिळवला आहे. त्यामुळे ती हा पराक्रम करणारी भारताची पहिली मिश्र मार्शल आर्ट (MMA) फायटर बनली आहे.

पुजाने शनिवारी युएफसी लुईसविलेमध्ये ब्राझीलच्या रेयान डॉस सेंटोसला स्ट्रॉवेट (५२ किलोग्रॅम) पदार्पणाच्या सामन्यात 30-27, 27-30, 29-28 अशा फरकाच्या स्प्लिट डिसिजननंतर विजय मिळवला.

Puja Tomar
Ind vs Pak : पाकिस्तानवर टांगती तलवार... आज स्पर्धेतून होणार बाहेर? नाणेफेक महत्त्वाची पण भारताचं पारडं जड

पुजाने या विजयानंतर आनंद व्यक्त केला असून ती म्हणाली, 'हा फक्त माझा विजय नाही, तर हा विजय सर्व भारतीय चाहत्यांचा आणि सर्व भारतीय फायटर्सचा आहे. आधी सर्वजण विचार करायचे की भारतीय फायटर येथे उभे राहू शकत नाही. माझा फक्त हाच विचार होता की मला इथे जिंकायचे आहे आणि जगाला दाखवायचे आहे की भारतीय फायटर लूझर नाहीत.'

ती म्हणाली, 'मला छान वाटत आहे. मी घरून येथे आले, तेव्हा जिंकण्याचाच विचार केला होता. मी खूप मेहनत घेतली आहे, म्हणून मी येथे आहे. प्रेक्षक मला पाठिंबा देत होते. मी प्रेरणेने भरलेले होते आणि माझ्यात ताकद आहे, म्हणून मी जिंकले.'

Puja Tomar
Ind vs Pak : पाकिस्तानवर टांगती तलवार... आज स्पर्धेतून होणार बाहेर? नाणेफेक महत्त्वाची पण भारताचं पारडं जड

उत्तर प्रदेशमधील बुधाना गावात जन्मलेल्या पुजाने पाच वेळा नॅशनल वुशू चॅम्पियनशीप जिंकली आहे. तसेच तिने कराटे आणि तायकांदोही खेळले आहे.

तिने तिच्या आईला या विजयाचे श्रेय देखील दिले आहे. तिने म्हटले आहे का प्रवास सोपा नव्हता. तसेच हा विजय आईसाठी आहे कारण ती माझ्यासाठी जगाशी लढली.

30 वर्षीय पुजाने गेल्यावर्षी युएफसीबरोबर करार केला होता आणि ती एमएमए मधील सर्वात मोठ्या स्पर्धेत सहभागी होणारी पहिली महिला खेळाडू बनली आहे. दरम्यान, यापूर्वी अंशुल जुबली आणि भरत कंडोर यांनी युएफसीच्या स्पर्धा खेळल्या आहेत, पण त्यांना पहिला सामना जिंकता आलेला नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com