Pullela Gopichand sakal
क्रीडा
Pullela Gopichand : बॅडमिंटनची घसरलेली गाडी लवकरच रुळावर; गोपीचंद यांना आशा, देशातील युवा खेळाडूंच्या क्षमतेवर विश्वास
Badminton India: पुल्लेला गोपीचंद यांनी भारतातील युवा बॅडमिंटनपटूंवर विश्वास व्यक्त करत लवकरच बॅडमिंटनचा घसरलेला फॉर्म परत येईल असे सांगितले. ते नागपुरात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
नागपूर : भारतात भरपूर गुणवत्ता व गुणवान बॅडमिंटनपटू आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर ते चांगले प्रदर्शनही करीत आहेत. दुर्दैवाने अपेक्षित निकाल समोर आले नाहीत. सद्यःस्थितीत सहा-सात युवा खेळाडू उत्तम कामगिरी करीत असून, त्यांच्याकडून भविष्यात खूप अपेक्षा आहेत.

