तिरंगा घेऊन धावण्याचा आनंद!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 डिसेंबर 2018

मी कंपनीच्या कामासाठी अमेरिकेतील ओरेगॉनमधील नाईकी कंपनीत गेलो. ते ऑफिस म्हणजे एक स्पोर्टस कॉम्प्लेक्‍सच होते. तेथे जॉगिंग ट्रॅक होता. इतरही खेळांच्या सुविधा होत्या. मी एक दिवस ट्रॅकवर गेलो. 200, 300 मीटर चाललो तोच मला दम लागला. त्याचवेळी पोर्टलॅंड मॅरेथॉन पाहण्याचाही योग आला. त्यात 75 वर्षांचे आजोबा, अंध व्यक्ती, कृत्रिम पाय असलेले धावपटू धावत होते.

अमेरिकेतून पुण्यात आल्यानंतर मी धावायला सुरवात केली. आवडीमुळे मला शर्यतींत भाग घेण्याची गोडी लागली. 2014 मध्ये मी कंपनीच्या कामासाठी पुन्हा अमेरिकेत गेलो. तेथील हाफ मॅरेथॉन धावलो. दोन तास 32 मिनिटे माझी वेळ होती. वयाच्या 48व्या वर्षी मी सुरवात केली तीच हाफ मॅरेथॉनने. तेव्हापासून मी सातारा, बर्निल, न्यूयॉर्क अशा अनेक ठिकाणी धावलो आहे.
मी तिरंगा घेऊन धावतो. न्यूयॉर्क मॅरेथॉनमध्ये एक सरदारजीसुद्धा धावत होते. मला पाहून त्यांनी शाबासकी दिली. विविध ठिकाणचे भारतीय बांधव मला नेहमीच प्रोत्साहन देतात.

Web Title: Pune half marathon